मुंबईत आयोजित चटपटीत मोमोज फेस्टिव्हल

मुंबईच्या काही भागांमध्ये अलीकडच्या काळात एक वेगळा पदार्थ युपर डुपर हिट ठरू लागला आहे. दक्षिणेच्या पदार्थांना म्हणजे इडली, मेदूवडा यांना प्राधान्य देणारा मुंबईकर संध्याकाळी थेट ईशान्येकडे वळलेला दिसतो. इडली तयार करण्यासारख्याच जर्मनच्या मोठ्या भांड्यात तयार केला जाणारा हा पदार्थ म्हणजे मोमोज. दिसायला नक्षीदार, पाहताच क्षणी भूक चाळवणारा, पचायला हलका आणि खिशालाही परवडणारा. अशाच या मोमोजचं फेस्टिव्हल सांताक्रुजमध्ये आयोजित करण्यात आलं आहे.

मोमोज मिल

तुम्हाला मोमोज खायला आवडतात? मग तुमच्यासाठी सांताक्रुजमध्ये मोमोज फेस्टिव्हल आयोजित करण्यात आलं आहे. या फेस्टिव्हल अंतर्गत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मोमोजचा आस्वाद घेऊ शकता. यामध्ये व्हेज मोमोज, नॉनव्हेज मोमोज, स्टिम्ड मोमोज, स्क्रीस्पी मोमोज, चीज मोमोज, आमची मोमोज असे प्रकार चाखता येणार आहेत. आता स्पायसी मोमोज खाल्ल्यानंतर काही गोड तर हवंच ना! मग त्याची देखील इथं सोय आहे. तुमचं तोंड गोड करण्यासाठी डार्क चॉकलेट मोमोज इथं आहेत. फक्त मोमोज नाही तर चायनीज आणि तिबेटीयन फुडचा देखील आस्वाद तुम्ही घेऊ शकता. बर्गर, नूडल्स, वेगवेगळे सूप्स हे पदार्थ देखील तुम्ही ट्राय करू शकता.

कधी?

तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मोमोज ट्राय करायचे असतील तर नक्की या फेस्टिव्हलला भेट द्या. १ जुलै म्हणजेच रविवारी हा फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. यासाठी तुम्हाला प्रत्येकी ५०० रुपये मोजावे लागतील. जर तुम्ही दोघं असाल तर ७५० रुपये मोजावे लागतील. यामध्ये  तुम्ही अनलिमेटेड मोमोज खाऊ शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही @DumplingKhang या त्यांच्या फेसबुक पेजला भेट  देऊ शकता.

कुठे?

डम्पलिंग खांग, शॉप ३, सदानंद बिल्डींग, अँथनी रोड, वाकोला, सांताक्रुज


हेही वाचा

तुम्ही कटिंग डिझर्ट ट्राय केलंत का?

पुढील बातमी
इतर बातम्या