Advertisement

तुम्ही कटिंग डिझर्ट ट्राय केलंत का?


तुम्ही कटिंग डिझर्ट ट्राय केलंत का?
SHARES

काचेच्या ग्लासमधून आपण अनेकदा टपरीवर चहा पितो. पण तुम्ही याच काचेच्या ग्लासमधून कधी डिझर्ट खाल्लं आहे का? नसेल, तर तुम्हाला ती संधी मिळणार आहे'एलिमेंटेरिया बेकरी आणि कॅफे'नं डिझर्टला अनोख्या पद्धतीने सादर करत खवय्यांना आकर्षित करण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे.

आपल्या खाद्यसंस्कृतीत काळानुरूप अमुलाग्र बदल झाले आहेत. खवय्यांना आकर्षित करण्यासाठी पदार्थ वेगळ्या पद्धतीनं मांडण्यात येतातकाही तरी नवीन आणि हटके प्रयोग करून साधा पदार्थ वेगळ्या पद्धतीत प्रेजेंट केला जातो. या कल्पनेतून साकारलेला 'एल कटिंग डिझर्टखवय्यांसाठी अनोखा ठरणार आहे.



'एल कटिंग डिझर्ट'ची खासियत?

कटिंग ग्लासमधून तुम्हाला हा डिझर्ट सर्व्ह करण्यात येईल. यामध्ये सहा ग्लासचा टी स्टँड असेल. या टी स्टँडमध्ये वेगवेगळ्या फ्लेवर्सचे डिझर्ट असतीलपहिला ग्लास असेल 'आयरीश हॅझलनट चाय डिझर्ट'. यामध्ये चॉकलेट स्पाँज, मिल्क चॉकलेट, रोस्टेड हॅजलनट यांचा समावेश असेलदुसरं ग्लास असेल 'विस्की मास्करपोन', तिसरा असेल 'किट-कॅट ग्लास'. 'ब्लुबेरी ग्लास', 'चारकोल मोका' आणि 'बवेरिअन डार्क चॉकलेट' ही नावं ऐकून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल.



प्रत्येक डिझर्टसाठी तुम्हाला १५० रुपये मोजावे लागतील. एका ग्लासच्या स्टँडमध्ये तुम्हाला ६ वेगवेगळे फ्लेवर्स चाखण्यासाठी दिले जातात. तुमचा मोठा ग्रुप असेल तर तुम्ही एकच स्टँड मागवलात तरी पुरेसा ठरतो. कारण एका स्टँडमध्ये तुम्हाला सहा वेगवेगळे फ्लेवर्स ट्राय करायला मिळतात. कटिंग चहा तर तुम्ही नेहमीच घेता. पण हा कटिंग डिझर्ट नक्की ट्राय करा.


कुठे?

नूर महल, पूनम स्टोअर जवळकिंग सर्कलमाटुंगा

खिमजी नागजी चाळ १, शॉप १०, फिनिक्स मॉल समोरलोअर परेल



हेही वाचा-

चिझी, स्पायसी आणि डिझर्ट पिझ्झा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा