कुलाबा केंद्राला बिपिन अांतरकेंद्र फुटबाॅल स्पर्धेचे विजेतेपद

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • फुटबॉल

शालेय आणि ज्युनियर स्तरावर युवकांत फुटबॉलची लोकप्रियता वाढवणाऱ्या बिपीन फुटबॉल अकादमीच्या ३०व्या आंतरकेंद्र फुटबॉल स्पर्धेत (१६ वर्षांखालील) यंदा कुलाबा केंद्राच्या फुटबॉलपटूंनी अफलातून कामगिरी केली. त्यांनी अंतिम लढतीत कल्याण केंद्राला १-० असं पराभूत करत आपल्या संघाला आंंतरकेंद्र बिपीन स्मृती चषक पटकावून दिला. विजेत्या संघाचा आयुष माने विजयाचा हिरो ठरला. या स्पर्धेत मुंबईतील आठ केंद्रांच्या १५० फुटबॉलपटूंनी भाग घेतला होता.

मिरान मालानीचा गोल निर्णायक

कांदिवलीच्या पोयसर जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या बिपीन आंतरकेंद्र फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीत कुलाबा केंद्राने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करीत बलाढ्य कल्याण संघाला जोरदार लढत दिली. अखेरच्या मिनिटाला कुलाबाच्या आयुष मानेने कॉर्नर किक लगावली. त्यावर मिरान मालानीने अफलातून गोल नोंदवत कुलाबाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोशिएशनचे सुधाकर राणे, बिपीन मेमोरियलच्या विश्वस्त व माजी न्यायमुर्ती मंजुळा राव-चेल्लुर, नगरसेविका प्रियांका मोरे आणि ‘बिपीन’चे अध्यक्ष सतिश उचिल हे मान्यवर उपस्थित होते. सुरेंद्र करकेरा हे स्वत:कडील पैसे खर्च करत अवितरपणे या स्पर्धेचं अायोजन करत अाहेत.

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू

प्लेयर ऑफ दी टूर्नामेंट : आयुष माने (कुलाबा)

विविध केंद्रांचे सर्वोत्तम खेळाडू : कुमार राठोड (बीएमसी), आयुष माने (कुलाबा), रितिक सरफरे (अंधेरी), अफान सय्यद (उल्हासनगर), अशोक (कल्याण), सतेंद्र यादव (कांदिवली), गोविंद राठोड (चर्चगेट), आर्यन राज (विरार)


हेही वाचा -

बिपीन फुटबाॅल अांतरकेंद्र फुटबाॅल स्पर्धा १२ मे रोजी

पुढील बातमी
इतर बातम्या