Advertisement

बिपीन फुटबाॅल अांतरकेंद्र फुटबाॅल स्पर्धा १२ मे रोजी


बिपीन फुटबाॅल अांतरकेंद्र फुटबाॅल स्पर्धा १२ मे रोजी
SHARES

अनेक राष्ट्रीय अाणि अांतरराष्ट्रीय फुटबाॅलपटू घडविणाऱ्या अाणि कोणत्याही अार्थिक पाठबळाशिवाय गेली ३० वर्षे अविरतपणे फुटबाॅल स्पर्धा व प्रशिक्षण शिबिरे भरविणाऱ्या बिपीन फुटबाॅल अकादमीतर्फे एकदिवसीय फुटबाॅल स्पर्धेचे अायोजन करण्यात अाले अाहे. बिपीन फुटबाॅल अकादमीने ३०व्या वर्षात पदार्पण केल्याचा जल्लोष म्हणून १२ मे रोजी कांदिवलीतील पोईसर जिमखाना येथे ही स्पर्धा घेण्यात येणार अाहे. 



अाठ संघांचा समावेश

या स्पर्धेत अाठ संघ सहभागी होणार अाहेत. या अाठ संघांची दोन गटांत विभागणी करण्यात अाली अाहे. अ गटात बीएमसी, कांदिवली, अंधेरी अाणि कुलाबा हे संघ असतील तर ब गटात चर्चगेट, कल्याण, विरार अाणि उल्हासनगर हे संघ सहभागी होतील. 



असे रंगतील सामने

पहिला सामना १२ मे रोजी सकाळी ८ वाजता बीएमसी अाणि कांदिवली यांच्यात खेळविण्यात येईल. त्यानंतर अंधेरी अाणि कुलाबा यांच्यात सामना होईल. चर्चगेट वि. कल्याण अाणि विरार वि. उल्हासनगर असे सामने रंगतील. या सामन्यांतील विजेते संघ उपांत्य फेरीत दाखल होतील. अखेरीस अंतिम सामना खेळविण्यात येईल. बिपीन फुटबाॅल अकादमीतर्फे सर्व सहभागी विद्यार्थ्यांना मोफक किट देण्यात येईल तसेच विजेत्यांना चषक अाणि अाकर्षक बक्षिसे देण्यात येतील.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा