मुंबईत रुग्णसंख्येत सातत्याने घट, सोमवारी १ हजार ५७ नवीन रुग्ण

मुंबईत आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं दिसून येत आहे. मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत आहे. सोमवारी मुंबईत कोरोनाचे नवीन १ हजार ५७ रुग्ण आढळले. तर १ हजार ३१२ रुग्ण बरे झाल आहेत. नवीन रुग्णांपेक्षा बरे होण्याची रुग्णांची संख्या रोज अधिक आहे. 

सोमवारी मुंबईत ४८ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये २६ रुग्ण सहव्याधींनी ग्रस्त होते. मृतांमध्ये ३ रुग्ण ४० वर्षांखालील, १९ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील आणि २६ रुग्ण ६० वर्षांवरील होते. २८ पुरुष आणि २० महिलांचा मृत्यू झाला. मृतांचा एकूण आकडा आता १४ हजार ६७१ झाला आहे. 

 मुंबईत सध्या कोरोनाचे २८ हजार ८६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के आहे. तर रुग्णवाढीचा दर ०.२० टक्के आहे. तसंच रुग्णदुपटीचा कालाावधी ३३४ दिवसांवर गेला आहे. सोमवारी २१ हजार ९४७ चाचण्या करण्यात आल्या. आतार्यंत मुंबईत ६० लाख ९३ हजार ९४७ चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. 



हेही वाचा -

मुंबईतील 'या' आठवड्याचं लसीकरण नियोजन जाहीर

दादर परिसरात टॅक्सी चालकाची हत्या

पुढील बातमी
इतर बातम्या