कल्याण डोंबिवलीत १०१ नवे कोरोना रुग्ण, ८ जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी १०१ नवीन कोरोना रुग्ण आढळले.  तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत १२६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. 

पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २६,९१८ झाली आहे. यामध्ये ३१२४ रुग्ण उपचार घेत असून २३,२२१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ५७३ जणांचा  मृत्यू झाला आहे.

नवीन  १०१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व १३, कल्याण पश्चिम ३०, डोंबिवली पूर्व २८, डोंबिवली पश्चिम १४, मांडा टिटवाळा ५, मोहना ४, तर पिसवली येथील ७ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ५४ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १७ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ५ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ११ रुग्ण होलीक्रॉस रुग्णालयातून, ५ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ५ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, १ रुग्ण आसरा फाऊंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.


 हेही वाचा -

विलगीकरण केंद्रातला आनंदोत्सव करतोय मनावरील ताण हलका!

१६ रुग्णालयांवर केडीएमसीची कारवाई, कोरोना रुग्णांकडून अधिक बिल आकारलं 

लाॅकडाऊन पूर्णपणे काढून टाका! मनसेच्या सर्वेक्षणाचा कौल जाहीर



पुढील बातमी
इतर बातम्या