Advertisement

विलगीकरण केंद्रातला आनंदोत्सव करतोय मनावरील ताण हलका!

कोरोनाबाबत सातत्याने सुरू असलेल्या चर्चा आणि समाजमाध्यमांवरील संदेशांमुळे निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या वातावरणामुळं मानसिक रुग्णांची अस्वस्थता वाढली आहे

विलगीकरण केंद्रातला आनंदोत्सव करतोय मनावरील ताण हलका!
SHARES

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसनं मार्च महिन्यात भारतात प्रवेश केला. या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूवातीला फारच कमी होता. परंतु, हळुहळू तो प्रचंड वाढत गेला. कोरोना व्हायरसचा धोका आणि नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता सर्वच शासकीय यंत्रणा धडाधड कामाला लागल्या. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी ठिकठिकाणी कोरोना विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील परिस्थिती लक्षात घेत योग्य ते निर्णय घेण्यास सुरूवात केली. परंतु, देशाच्या एका कोपऱ्यात असलेला 'कोरोना' आपल्याला होईल अशी अपेक्षाच कोणी केली नव्हती. या कोरोनानं अनेकांना घेरलं. कोरोनाची लागण झाल्याचं समजताच अनेकांच्या पायाखालची सरकली, डोळ्यापुढे अंधारी आली. पण आजाराला न घाबरता रुग्णांनी उपचारासाठी विलगीकरण केंद्रात जाण्याचा निर्णय घेतला.

कोरोना हा इतर आजारांपेक्षा वेगळा आणि नागरिकांना 'मानसिक त्रास' देणार आहे. कोरोनाबाबत सातत्याने सुरू असलेल्या चर्चा आणि समाजमाध्यमांवरील संदेशांमुळे निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या वातावरणामुळं मानसिक रुग्णांची अस्वस्थता वाढली आहे. कोरोना संसर्गाचा होणारा प्रसार, वाढती रुग्णांची संख्या याबाबत सर्वत्र होणारी चर्चा, समाजमाध्यमांमधून पसरविल्या जाणाऱ्या अफवा यामुळे रुग्णांमधील मानसिक भीती अकारण वाढत आहे. मात्र, या भीतीतून रुग्णांना मुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागातील दादर परिसरातील विलगीकरण केंद्रात डॉक्टर रुग्णांकडून वेगवेगळ्या अॅक्टीव्हीटीज करून घेत आहेत.

हेही वाचा - कोविड सेंटरच्या कामात कुठलाही भ्रष्टाचार नाही, महापौरांनी फेटाळले मनसेचे आरोप

योगासनं, खेळ, अंताक्षरी, हावजी, चित्रकला, आपल्यातील कला सादर करणं यांसारख्या अॅक्टीव्हिटीजना या ठिकाणी वाव दिला जात आहे.  या अॅक्टीव्हीटीजची सुरूवात डॉ. शुभांगी कांबळे यांनी सुरूवात केली. दादर येथील डिसिल्वा विलगीकरणात या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली असून, ब्रम्हण सेवा मंडळ, वनिता समाज या विलगीकरण केंद्रातही हा उपक्रम राबवला जात आहे.

श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना असल्यानं प्रत्येक जण आपल्या घरी आनंदात सण साजरा करतात. गोडधोडाचा बेत करून देवाला नैव्यद्य दाखवतात. पण विलगीकरण केंद्रात असल्यानं काहीच करता येत नाही. त्यामुळं विलगीकरण केंद्रातील रुग्णांना याचा आनंद घेता यावा यासाठी रक्षाबंधन, गणेशोत्सव विलगीकरणात साजरा केला जात आहे.

सध्या गणेशोत्सव सुरू असून अनेकांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. पण विलगीकरण केंद्रात असल्यानं यंदा बाप्पाचं दर्शन घेणं अनेकांना शक्य होत नाहीय. बाप्पाच्या आरतीचा मान मिळत नाही. त्यामुळं रुग्ण नाराज आहेत. रुग्णांची ही नाराजी दूर करण्यासाठी आणि गणेशोत्सवाचा आनंद रुग्णांना मिळावा यासाठी वनिता समाज विलगीकरणातील डॉक्टर श्रृतीका यांच्या पुढाकाराने गणेश आरती घेतली जात आहे. यामुळं रुग्णाच्या मनावरील ताण कमी होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

कोरोनाच्या चर्चा, विचारांमुळं झालेल्या मानसिक ताणातून रुग्णांना बाहेर काढण्यासाठी योगासनं केली जातात. त्यानंतर डान्स, अंताक्षरी आणि खेळ खेळले जातात. रुग्णांकडूनही याला चांगला प्रतिसाद मिळत असून यामुळं रुग्णांवरील मानसिक ताण कमी होत आहे. रुग्णांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं आहे. 

- डॉ. शुभांगी कांबळे

गणेशोत्सवाआधी रक्षाबंधन झालं. त्यावेळी ब्राम्हण सेवा मंडळ या विलगीकरण केंद्रात रक्षाबंधन साजरी करण्यात आली. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आलं. या दिवशी रुग्णांनी राष्ट्रगीत म्हटलं, त्यानंतर अनेकांनी गाणी म्हटली. त्यामुळं मनावरील ताण कमी झाला. तसंच, आनंदाचं, उत्साही वातावरण निर्माण झालं.

रुग्णांचा सकारात्मक प्रतिसाद

डॉक्टरांच्या या संकल्पनेमुळं आम्ही आनंदी आहोत. आमच्या तब्येतील सुधारणा होत आहे. मागील अनेक दिवसांपासून कोरोनाच्या संकटाचा सामना करून आमच्यातील बळ संपलं होतं. परंतु, डॉक्टरांच्या उपचारांनी आम्हाला उर्जा मिळाली आहे. योगा आणि इतर खेळ खेळल्यामुळं आनंदाचं वातावरण निर्माण झालं.

- सुवर्णा पवार

विलगीकरण केंद्रात डॉक्टरांनी सुरू केलेल्या या संकल्पनेमुळं आम्ही सतत काहीना काही करण्यात व्यस्त असायचो. वेळ कसा निघून जायचा कळायचं नाही. मनावरील ताण कमी व्हायचा. अंताक्षरी, हावजी खेळल्यानं वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं. 

- सविता पार्धी



हेही वाचा -

यंदा डॉक्टर, पोलीस, सफाई कामगारांच्या रुपात अवतरले बाप्पा

मुंबई महापालिकेचा नवा प्रयोग, आवाजावरुन कोरोना चाचणीला सुरुवात


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा