Advertisement

यंदा कोरोना योद्ध्याच्या रुपात अवतरले बाप्पा!

कोरोना योद्धांना मानवंदना देण्यासाठी भक्तांनी डॉक्टर, पोलीस, सफाई कामगारांच्या रुपात बाप्पांची प्रतिष्ठापना केली आहे.

यंदा कोरोना योद्ध्याच्या रुपात अवतरले बाप्पा!
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं अनेकांचे घर उद्ध्वस्त झालेत, तर अनेकांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावं लागलं आहे. अशातच डॉक्टर, नर्स, पोलिस सफाई कर्मचारी हे स्वतःच्या जीवावर उदार होउन देशवासियांची सेवा करत आहेत. त्यामुळं या कोरोनायोद्धांना मानवंदना देण्यासाठी भक्तांनी डॉक्टर, पोलीस, सफाई कामगारांच्या रुपात बाप्पांची प्रतिष्ठापना केली आहे.

या कोरोनाच्या संकटामुळं यंदा गणेशोत्सवाचे अनेक मोठे सोहळे देखील रद्द झाले आहेत. पण संकटातही उत्साह कमी होऊ न देता यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जात आहे. इतकंच काय तर यंदा अनेकांनी कोरोनाशी लढा अशी थीम बनवून मखराची सजावट केली आहे. मुंबईच्या अनेक मंडळांमध्ये व घरा-घरांमध्ये डॉक्टर, नर्स, पोलिस सफाई कर्मचारी यांच्या रुपातील बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

परळ येथील विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठान या मंडळानं कोरोना व्हायरसचा वध करणाऱ्या रुपातील बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. मूर्तीकार राजेश जाधव यांनी ही मूर्ती साकारली आहे.

हेही वाचा - आश्चर्य! गणेशोत्सवात पहिल्यांदाच लालबाग, परळ शांत

घाटकोपर येथील एका रहिवाशानं सॅनिटायझरचा बाप्पा या संकल्पनेवर आधारीत बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. 

नागपूरमधील हिलटॉपचा राजा नावानं ओळखल्या जाणाऱ्या एकता गणेशोत्सव मित्र मंडळानं कोरोना रुग्णालयाचा देखावा साकारला आहे. तसंच, ४ फूट उंचीचे गपणती बाप्पा हे डॉक्टर्सचा कोट घालून, हातात स्टेथस्कोप घेऊन उभे आहेत. बाप्पांच्या बाजूला कोविड योद्धे आरोग्य कर्मचारी आणि पोलीस दिसत आहेत.

दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनेवर बाप्पाची मूर्ती साकरण्यात येते. विशेषत: सार्वजनिक मंडळांमध्ये एखाद्या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकाराची, सामाजिक कार्यांना प्रोत्साहन देणारा बाप्पा अशा वेगवेगळ्या रुपात बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. परंतु, यंदा कोरोनाच्या महामारीमुळं संपूर्ण जगातील नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळं हे संकट दूर करण्यासाठी अनेक भक्त बाप्पाला साकडं घालत आहेत. 



हेही वाचा - 

मुंबईच्या तलावांत ९३.७४% जलसाठा; पाणीटंचाईचा प्रश्न सुटण्याची शक्यता

तर, महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर पडू, काँग्रेस नेत्याचं धक्कादायक वक्तव्य



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा