Advertisement

Ganpati festival 2020 यंदा नातेवाईकांना गणपतीच्या दर्शनाला नो एन्ट्री

यंदा कोरोनामुळं नातेवाईकांना गणेश दर्शनासाठी न बोलण्याचा निर्णय अनेकांनी घेतला आहे.

Ganpati festival 2020 यंदा नातेवाईकांना गणपतीच्या दर्शनाला नो एन्ट्री
SHARES

राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं यंदा गणेशोत्सव साधेपणानं साजरा केला जात आहे. मुंबईतील गणेशोत्सव हा प्रसिद्ध असून, जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण हा उत्सव पाहायला मुंबईत येतात. गणेशोत्सवात प्रत्येक भक्तगण घरी आलेल्या बाप्पाच्या पाहुणचारासाठी विविध प्रकार करत असतात. गोड-गोड मोदक करून बाप्पाला नैव्यद्य दाखवलं जातं. त्याचप्रमाणं बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक भक्त आपल्या नातेवाईकांच्या घरी जातात. परंतु, यंदा कोरोनामुळं नातेवाईकांना गणेश दर्शनासाठी न बोलण्याचा निर्णय अनेकांनी घेतला आहे. अशात कोरोनाच्या भितीनं गणेशोत्सवही साधेपणानं साजरा केला जात आहे.

यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांनी यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, २ फुटांची मूर्ती ठेऊन विशेष म्हणजे सोसायटीच्या आवरतच सभासदांसाठी कृत्रिम तलावाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा असं आवाहन जनतेला केले आहे. तर राज्य सरकार आणि महापालिकेनं सुद्धा गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात नियमावली जारी केली आहे.

सोसायट्यांनी नियमावली आखली असून, गणपती बाप्पाच्या दर्शनावेळी मास्क लावणं बंधनकारक असून सुरक्षित अंतराचं काटेकोरपणं पालन करा. ज्या सभासदांच्या घरी गणपती आहे, त्यांनी नातेवाईक, मित्रमंडळी अथवा सोसायटीतील इतर सदस्यांना आपल्या घरी गणपती व गौरीच्या दर्शनाला आमंत्रित न करता साधेपणानं उत्सव साजरा करावा. यंदाच्या गणेशोत्सवावर आलेलं कोरोनाचं संकट आणि नियमाखाली साजरा होत असलेल्या या उत्सवाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.हेही वाचा -

Electricity Bill: गुड न्यूज: राज्य सरकार उचलणार वाढीव वीज बिलाचा भार!

Ganesh Festival 2020: 'गणपतीसाठी कोकणात जाण्यावर घातलेले निर्बंध योग्यच'संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा