Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,09,215
Recovered:
47,07,980
Deaths:
79,552
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
37,656
1,657
Maharashtra
5,19,254
39,923

आश्चर्य! गणेशोत्सवात पहिल्यांदाच लालबाग, परळ शांत

गणेशोत्सवातील १० दिवस हा परिसर भक्तांच्या गर्दीनं फुललेले असतो.

आश्चर्य! गणेशोत्सवात पहिल्यांदाच लालबाग, परळ शांत
SHARES

कोरोना व्हायरच्या प्रादुर्भावामुळं यंदाचा गणेशोत्सव अगदी साधेपणानं साजरा केला जात आहे. दरवर्षी असणारा जल्लोश, उत्साह, गल्लोगल्ली लागणारी भक्तीगीतं यंदा काहीच नाही. विशेष म्हणजे मुंबईतील गणेशोत्सव पाहण्यााठी भक्तांची लालबाग-परळ या परिसरात मोठी गर्दी असते. गणेशोत्सवातील १० दिवस हा परिसर भक्तांच्या गर्दीनं फुललेले असतो. आकर्षक देखावे, प्रचंड गर्दीच्या मिरवणुका, रेल्वे स्थानकांवरील गर्दी...लालबाग-परळ परिसरात दरवर्षी हमखास दिसणारे हे दृश्य यंदा नाहिसे झाले आहे.

भक्तीमय आणि उत्साही वातावरणानं भारून टाकणारा हा परिसर सध्या शांत, सुना वाटतो आहे. दरवर्षी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून दररोज हजारो भाविक लालबाग-परळ इथं बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. बाप्पाच्या दर्शनासाठी परळ, करी रोड, चिंचपोकळी रेल्वे स्थानकापासून भक्तांचे लोंढे एकाच दिशेनं चालत असतात.

यंदा कोरोना व्हायरसच्या संकटामुळं राज्य सरकारनं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उत्सव साधेपणानं साजरा करण्याच्या सूचना दिल्या. मंडळांनीही ही सामाजिक जबाबदारी स्वीकारली आहे. बाप्पाचे ऑनलाइन दर्शन उपलब्ध करून दिलं आहे, आरोग्य तसंच रक्तदान शिबिरांचं आयोजन, जनजागृती कार्यक्रम यापुरताच यंदाचा गणेशोत्सव मर्यादित राहिला आहे.हेही वाचा -

Ganpati Festival 2020 Live: घरातूनच घ्या बाप्पाचं ऑनलाईन दर्शन

दीड दिवसांच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोपRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा