Advertisement

Ganpati festival 2020 Live: घरातूनच घ्या बाप्पाचं ऑनलाईन दर्शन

अनेक मंडळांनी यंदा ऑनलाईन बाप्पाचं दर्शन देण्याचा निर्णय घेतला आहे.

Ganpati festival 2020 Live: घरातूनच घ्या बाप्पाचं ऑनलाईन दर्शन
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव राज्यभरात साधेपणानं साजरा केला जात आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी गर्दी टाळण्याचं आवाहन राज्य सरकरनं केलं आहे. तसंच, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणपतीच्या मूर्तीची उंची कमी करण्याचं आवाहन केलं आहे. त्याशिवाय, महापालिका प्रशासनानं यंदा बाप्पाच्या आगमन व विसर्जनासाठी नियमावली आखून दिली आहे. त्यामुळं अनेक मंडळांनी यंदा ऑनलाईन बाप्पाचं दर्शन देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असला तरी, गणपतीची सजावट, तयारी भक्तांना उत्साहत केली. जगप्रसिद्ध असलेल्या मुंबईतील गणेशोत्सव यंदा साधेपणानं साजरा होत आहे. तसंच, भक्तांना घरातूनच बाप्पाचं दर्शन मिळावं यासाठई ऑनलाईन दर्शनाची सोय करण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील अनेक गणपती मंडळांनी उत्सव रद्द केले आहेत.

अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी थेट दर्शनाची ऑफर दिली आहे आणि दर्शनाची ही पद्धत प्रेक्षकांना आवडली आहे. दरवर्षी लाखो भाविक बाप्पांचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिर आणि मंडळाबाहेर लांबच लांब रांगा लावतात. मात्र, यंदा साथीच्या रोगाने आपल्या जीवनात एक मोठा बदल घडवून आणला आहे. सरकारने सर्व मंडळांना त्यांच्या मूर्तींना ४ फूट मर्यादित करण्यास सांगितले आहे. तसंच, गणपती विसर्जनासाठीही कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

गणेशगल्ली - लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ (Watch below or click here)


जी.एस.बी. सेवा मंडळ (Watch below or click here)


सिद्धिविनायक मंदिर (Watch below or click here)


दगडूशेठ, पुणे (Watch below or click here)


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा