Advertisement

दीड दिवसांच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप

महापालिकेने गणपती विसर्जनासाठी चोख व्यवस्था ठेवली होती.

दीड दिवसांच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप
SHARES

वाजत गाजत आलेल्या लाडक्या बाप्पांना रविवारी दीड दिवस पूर्ण होताच भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया या.. पुढच्या वर्षी लवकर या..' या गजरामध्ये दीड दिवसाच्या बाप्पांचे आज मुंबईत विसर्जन करण्यात आले. गणपतीचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावाचा वापर सुद्धा करण्यात आला.

हेही वाचाः- गणपती विसर्जना दरम्यान हे ९ नियम पाळावेच लागणार

'गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या', 'गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला'...'एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार', या जयघोषांसह मुंबईत दीड दिवसांच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. यंदाच्या गणेशोत्सवातील पहिला विसर्जन सोहळा पार पडला. मुंबईसह राज्यात शनिवारी गणरायाचे वाजत गाजत मोठ्या उत्साहात घरोघरी आगमन झाले होते. तर अनेकांच्या घरी परंपरेनुसार दीड दिवसांच्या गणपतीचे आगमन झाले होते. काल दुसऱ्या दिवशी दुपारनंतर दीड दिवस पूर्ण होताच या गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.सायंकाळी ६ वाजेपर्यंत दीड दिवसांच्या ३१ हजार २५५ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी ४२२२ मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. त्यात सार्वजनिक ६२१, घरगुती ३०हजार ६३४ गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले होते. दरम्यान, महापालिकेने गणपती विसर्जनासाठी चोख व्यवस्था ठेवली होती.

हेही वाचाः- गुड न्यूज ! राज्यात आता वाहतुकीसाठी ई-पासची गरज नाही

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवावर अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. विसर्जनाच्या दिवशी समुद्रावर गर्दी होऊ नये कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचं आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे. यासाठी मुंबईत कृत्रिम तलाव तयार करण्यात येत आहेत. कृत्रिम तलाव तयार करण्याची जबाबदारी पालिकेने संबंधित विभागातील सहाय्यक आयुक्तांवर सोपवली आहे. मुंबईतील २४ विभागांतील कृत्रिम तलावांची संख्या ३०० पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. मुंबईत गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटी, वरळी, दादर, वांद्रे, खार, सात बंगला, जुहू, वेसावे, गोराई, मढ, मार्वे या चौपाट्यांवर तसंच अन्य नैसर्गिक विसर्जनस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यंदा गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका असल्याने पालिकेने कृत्रिम तलावावर भर दिला. प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत १५ ते २०, तर काही ठिकाणी ३० ते ३५ कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहेत. अंधेरी के पूर्व विभागात ३५ कृत्रिम तलाव, तर दादर, माहीममध्ये १५ तलाव उभारण्यात आले आहे. त्याशिवाय फिरते कृत्रिम तलावही उपलब्ध केले जाणार आहेत. पालिकेने मागील वर्षी ३४ कृत्रिम तलाव तयार केले होते. या तलावांमध्ये ८०० ते ९०० सार्वजनिक, तर ३२ ते ३३ हजार घरगुती गणपतीचे आणि ८०० गौरींचं विसर्जन झालं होतं.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा