Advertisement

गणेशोत्सव काळात गर्दी होता कामा नये- मुख्यमंत्री

संपूर्ण उत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी असं आवाहन करतानाच गाफील न राहता आतापर्यंत आपण जी काळजी घेतो आहोत तीच पुढेही घ्यावी असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

गणेशोत्सव काळात गर्दी होता कामा नये- मुख्यमंत्री
SHARES

श्री गणेशाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही करत आहोत. मात्र यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचं विघ्न आहे. या विघ्नातून लवकरात मुक्ती मिळावी तसंच या साथीचा मुकाबला करण्यासाठी कोविड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना शक्ती मिळो, अशी प्रार्थना केल्याचं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला श्री गणेश आगमनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (ganesh chaturthi greetings from maharashtra cm uddhav thackeray)

आरोग्य, समाज प्रबोधनावर भर द्या

सण आणि उत्सवांची बदलेली रूपे आपण पाहिली आहेत, यातील काळानुरूप बदल आपण स्वीकारले आहेत. सामाजिक जागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली, कोरोनामुळे जिथे सगळं जग हादरून गेलं आहे तिथं याविरुद्ध एक मोठा लढा लढण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, यातून एक नवं समाज प्रबोधन आपण करू आणि सामाजिक भान ठेऊन शांततेत यंदाचा गणेशोत्सव आपण साजरा करू, असंही मुख्यमंत्री म्हणाले. 

हेही वाचा- Ganesh Utsav 2020 : कोरोनाच्या संकटात 'असा' साजरा होतोय गणेश गल्लीचा गणेशउत्सव

नियम पाळा, गाफीलपणा नको

संपूर्ण उत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी असं आवाहन करतानाच गाफील न राहता आतापर्यंत आपण जी काळजी घेतो आहोत तीच पुढेही घ्यावी असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. 

राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगर पालिका आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी नुकतीच चर्चा करून त्यांनाही सूचना दिल्या आहेत, असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आता ही वेळ नियम पाळून उत्सव साजरा करण्याची आहे. श्रीगणेशाचे आगमन असो किंवा विसर्जन असो, प्रत्येकाने कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या घरात, गल्लीत आणि कॉलनीत होणार नाही याची दक्षता घेणं अत्यावश्यक आहे. 

काही सार्वजनिक गणेश मंडळांनी सामजिक प्रबोधन व आरोग्य शिबिरे घेण्याचे नियोजन केलं आहे, त्यांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री म्हणाले की, गणेशोत्सवातून सार्वजनिक गणेश मंडळांनी  सामाजिक, प्रबोधनात्मक संदेश हाती घ्यावा तसंच मंडळांनी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिल्यास अधिक सोयीचं होईल. शासनाने घालून दिलेले नियम पाळत असल्याबद्द्ल मुख्यमंत्र्यांनी या मंडळांना धन्यवाद दिलं आहेत.

हेही वाचा- विघ्नहर्ता २०२० : चिंचपोकळीचा 'आरोग्य उत्सव'

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा