Advertisement

Ganesh Utsav 2020 : कोरोनाच्या संकटात 'असा' साजरा होतोय गणेश गल्लीचा गणेशोत्सव

लालबागला येणारा प्रत्येक भक्त मुंबईच्या या राजाचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. अशा या राजाचा दरबार यावर्षी ओस पडणार आहे.

SHARES

लालबाग म्हणजे गणेशोत्सव आणि गणेशोत्सव म्हणजे लालबाग... मुंबईचा राजा म्हणून गणेशगल्लीचा गणपती फार प्रसिद्ध आहे. लालबागला येणारा प्रत्येक भक्त मुंबईच्या या राजाचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाही.

अशा या राजाचा दरबार यावर्षी ओस पडणार आहे. याचं कारण म्हणजे कोरोनाव्हायरसचं घोघांवणारं संकट. कोरोनाच्या संकटामुळे लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ साधेपणानं गणेशोत्सव साजरा करणार आहेत. 

१९२८ मध्ये गणेश गल्लीच्या राजाची स्थापना झाली. तेव्हापासून वेगवेगळे देखावे सादर करणं ही मंडळाची जणू परंपराच. उंच मूर्ती आणि आकर्षक देखाव्यासाठी गणेश गल्ली मंडळ प्रसिद्ध आहे. गेल्यावर्षी या मंडळानं राम मंदिराची प्रतिकृती साकारली होती. पण यावर्षी कोरोना काळात सामाजिक भान जपत त्यांनी वेगवेगळे समाज हिताचे उपक्रम राबवले.


कोरोनाचं संकट असल्यानं भाविकांनी गणेशगल्ली राजाच्या दरबारात गर्दी करू नये अशी विनंती केली आहे. असं असलं तर लाडक्या बाप्पाचं दर्शन घेता येणार नाही यामुळे निराश होण्याचं कारण नाही. कारण घरबसल्या तुम्हाला गणेशगल्लीच्या राजाचं दर्शन घेता येईल, असी सोय मंडळा तर्फे करण्यात आली आहे.



हेही वाचा

सार्वजनिक गणेशोत्सव मंडपांवर तपासणी पथकांची नजर

गणपती विसर्जनासाठी मुंबईत ३०० कृत्रिम तलाव

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा