Advertisement

गणेश विसर्जनासाठी ऑनलाईन नोंदणीला डिमांड, 'या' चौपाटीला अधिक प्राधान्य

यंदा कोरोनाचा सावट पाहता गर्दी टाळणं आवश्यक आहे. यासाठी पालिका वेगवेगळे उपाय राबवत आहे.

गणेश विसर्जनासाठी ऑनलाईन नोंदणीला डिमांड, 'या' चौपाटीला अधिक प्राधान्य
SHARES

गणेश विसर्जनासाठी पालिकेनं ऑनलाईन बुकिंगला सुरुवात केली होती. या संकेतस्थळाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत दोन हजार हून अधिक भाविकांनी पालिकेच्या shreeganeshvisarjan.com या संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. यासोबतच बहुतांश भाविकांना गिरगाव चौपाटीला गणेश विसर्जनासाठी पसंती दिली आहे.

पालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, नोंदणी केलेल्या बहुतांश नागरिकांनी गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जन करण्यासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे गिरगाव चौपाटीवर गर्दी होण्याची शक्यता आहे. याच कारणास्तव कृत्रिम तलावाच्या आसपासच्या भाविकांना जवळील तलावातच गणेश विसर्जन करावं, अशी विनंती पालिकेकडून करण्यात आली आहे. गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी नोंदणी केलेल्या भाविकांशी त्यासाठी संपर्क साधण्यात येत आहे.

हेही वाचा : नवी मुंबईत गणेश मूर्तींची होम डिलीव्हरी

नोंदणी केलेल्या भाविकांना विसर्जनासाठी समुद्रात उतरण्यास मज्जाव करण्यात येणार आहे. गणेशमूर्तीचे पालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच चौपाटीवर विसर्जन करण्यात येणार आहे. यासाठी चौपाटीवर आणि अनेक ठिकाणी पालिकेतर्फे संकलन केंद्र उभारण्यात येणार आहेत. संकलन केंद्रात मूर्ती दिली की त्याचं विसर्जन पालिका करणार. त्यामुळे भाविकांना समुद्रात विसर्जनासाठी उतरण्याची आवश्यक्ता भासणार नाही.  

गणपती विसर्जनासाठी दरवर्षी गिरगाव चौपाटीला भाविकांची अधिक पसंती असते. पण यंदा कोरोनाचा सावट पाहता गर्दी टाळणं आवश्यक आहे. यासाठी पालिका वेगवेगळे उपाय राबवत आहे. त्यासाठीच पालिकेनं अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले आहेत. याशिवाय घरोघरी जाऊन पालिका गणेश मूर्ती जमा करतील. यासाठी खास वाहनांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.हेही वाचा

Ganeshotsav 2020: कोरोनामुळं ग्राहकांची सजावटीच्या सामानाच्या खरेदीकडे पाठ

मुंबईत थेट विसर्जनाला बंदी, पालिकेनं दिले 'हे' पर्याय

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement