Advertisement

नवी मुंबईत गणेश मूर्तींची होम डिलीव्हरी

गणेश कार्यशाळेत गर्दी झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबईत आता गणेशमुर्तींची होम डिलीव्हरी देण्यात येत आहे.

नवी मुंबईत गणेश मूर्तींची होम डिलीव्हरी
SHARES

कोरोनामुळे गणेशोत्सव सुरू होण्याआधी एक किंवा दोन दिवस गणेशमूर्ती घरी नेण्याची परंपरा यंदा खंडित झाली आहे. गणेश कार्यशाळेत गर्दी झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबईत आता गणेशमुर्तींची होम डिलीव्हरी देण्यात येत आहे. आठ दिवस आधीच विक्रेत्यांकडून गणेशमुर्तीं घरपोच पोचवल्या जात आहेत.

गणरायाच्या आगमनादिवशी किंवा त्याआधी मूर्तीकारांच्या कार्यशाळेत गर्दी होऊ नये यासाठी नागरिकांनी एक आठवडा आधीच मूर्ती घरी घेऊन जाण्यास सुरुवात केली आहे. तर काही गणेश मूर्तिकारांनी कार्यशाळेत होम डिलीव्हरीचा पर्याय सुद्धा उपलब्ध केला आहे. मात्र त्याचे जादा दर आकरण्यात येत आहेत.

कोरोना काळात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे. कोरोनाचे सावट गणेश उत्सवावर आल्याने साध्या पद्धतीने गणेश उत्सव करण्यात येत आहे. नवी मुंबईतील ६५ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव रद्द करण्याचा निंर्णय घेतला आहे.



हेही वाचा -

मुंबईत थेट विसर्जनाला बंदी, पालिकेनं दिले 'हे' पर्याय

वांद्रेत रिकामी इमारत घरावर कोसळली




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा