वांद्रेत रिकामी इमारत घरावर कोसळली

घटनास्थळी ८-फायर वाहन, २-रेस्क्युव वाहन, २-जेसीबी, ४-डंपर व ५०-लेबर इत्यादीसह उपस्थित आहेत

वांद्रेत रिकामी इमारत घरावर कोसळली
SHARES

मुंबईच्या वांद्रे पश्चिम येथील शेरलो राजन रोड वरील एक इमारत कोसळल्याची घटना रात्री ८ च्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाली असून ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरू आहे.

हेही वाचाः- दिग्दर्शक-अभिनेता निशिकांत कामत यांचं निधन

वांद्रे पश्चिम येथील इमारत कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे ८ फायर इंजिन, १ रेस्क्यू व्हॅन, पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या शासकिय रुग्णालयात नेहण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जी इमारत कोसळली. ती मोडकळीत आली होती. त्यामुळे त्यात कुणीही रहात नव्हते. हिच इमारत रात्री ८.२८ च्या सुमारास शेजारच्या एका घरावर पडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात होती. घटनास्थळी ८-फायर वाहन, २-रेस्क्युव वाहन, २-जेसीबी, ४-डंपर व ५०-लेबर इत्यादीसह उपस्थित आहेत. त्या ठिकाणी ढिगारामध्ये अजुन काही रहिवासी अडकलेल्याची शक्यता आहे तरी अग्नीशमन दलाच्या जवानांनकडून शोधकार्य सुरू आहे असे मुंबई आपत्ती व्यवस्थापन कक्षातून मिळाली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा