Advertisement

माटुंगा, वांद्रे, दहिसरमध्ये पालिका करणार ‘सेरो’ सर्वेक्षण, 'हे' आहे कारण

या सर्वेक्षणात १० हजार रक्त नमुने गोळा करण्यात येणार आहेत.

माटुंगा, वांद्रे, दहिसरमध्ये पालिका करणार ‘सेरो’ सर्वेक्षण,  'हे' आहे कारण
SHARES

मुंबई महापालिका वांद्रे पश्चिम, माटुंगा आणि दहिसर परिसरातील नागरिकांचे रक्त नमुने घेऊन सर्वेक्षण (सेरो) करणार आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) सूचनेनुसार पालिकेने हे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संक्रमणाची तीव्रता समजण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. 

या सर्वेक्षणात १० हजार रक्त नमुने गोळा करण्यात येणार आहेत. नीती आयोग, ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फन्डामेंटल रिसर्च, मुंबई’ आणि अन्य संस्थांच्या सहकार्याने हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) आणि बिगर शासकीय संस्था यांचं पथक हे सर्वेक्षण करणार आहे. हे पथक नागरिकांच्या घरी भेटी देऊन माहिती आणि रक्त नमुने गोळा करणार आहे. कस्तुरबा सूक्ष्मजीव निदान वैद्यकीय प्रयोगशाळा, तसंच फरिदाबाद येथील ट्रान्सलेशलन हेल्थ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी इन्स्टिटय़ूटमध्ये हे नमुने पाठविण्यात येणार आहे. तेथे नमुन्यातील प्रतिपिंडांचे निदान करण्यात येणार आहे.

सेरो सर्वेक्षणासाठी यापूर्वी पालिकेने ५०० जणांच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. या सर्वेक्षणातून सर्वसाधारणपणे लोकसंख्येमध्ये झालेल्या संक्रमणाचा भौगिलिक फैलाव समजून घेण्यास मदत होणार आहे. मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. शुक्रवारी नवीन १२९७ रुग्ण आढळले.  मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आता ७२ हजार २८७ वर पोहोचली आहे. तर गेल्या ४८ तासांमध्ये ४४ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.हेही वाचा -


Coronavirus Pandemic: मुंबईत १२९७ नवे रुग्ण, दिवसभरात ४४ जणांचा मृत्यू

अरे बापरे ! राज्यात ५०२४ नवे रुग्ण, १७५ जणांचा मृत्यू


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा