Advertisement

Coronavirus pandemic: मुंबईत १२९७ नवे रुग्ण, दिवसभरात ४४ जणांचा मृत्यू

मुंबईत मागील २४ तासात करोनाचे ५९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ३९ हजार ७४४ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

Coronavirus pandemic:  मुंबईत १२९७ नवे रुग्ण, दिवसभरात ४४ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे १७९ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १२७९ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत शुक्रवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४४ रुग्ण दगावले आहेत. तर २५ जून रोजी ५८ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २४ जून रोजी रोजी एकूण ३८ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, शुक्रवारी मुंबईत कोरोनाचे १२९७ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ७२ हजार २८७ इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात  करोनाचे ५९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ३९ हजार ७४४ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

राज्यात आज कोरोनाच्या ५०२४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ६५ हजार ८२९ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत.आज २३६२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ७९ हजार ८१५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.२५ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख ७१ हजार ८७५ नमुन्यांपैकी १ लाख ५२ हजार ७६५ नमुने पॉझिटिव्ह (१७.५२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५८ हजार  ४८८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ९०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १७५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ९१ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८४ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर  ४.६५ टक्के एवढा आहे.

मागील ४८ तासात झालेले ९१ मृत्यू हे मुंबई मनपा-४४, कल्याण-डोंबिवली मनपा-२, नाशिक-१. नाशिक मनपा-७, पुणे मनपा-१४, कोल्हापूर-१, औरंगाबाद मनपा-१४, लातूर-२, नांदेड मनपा-२, अकोला-१, अकोला मनपा-१, नागपूर मनपा-१, गोंदिया-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

सक्रीय कंटेनमेंट झोन (चाळ)  ७५६

सीलबंद इमारती ६००५

२४ तासातील संपर्काचा शोध अति जोखिम  ६५७१

CCC1 मधील अति जोखीम  १६९७८

CCC1 मध्ये भर्ती असलेले अतिजोखिम १ लाख ६ हजार ९४०

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा