Advertisement

गणपती विसर्जनसाठी ठाणे महापालिका राबवणार आॅनलाइन बुकींग

गणेशोत्सवाच्या काळात विसर्जनाच्यावेळी गर्दी होऊ नये यासाठी ठाणे महानगरपालिकेने ऑनलाईन पद्धतीचा नागरिकांनी अवलंब करावा असं आवाहन केलं आहे.

गणपती विसर्जनसाठी ठाणे महापालिका राबवणार आॅनलाइन बुकींग
SHARES

राज्यात पहिल्यांदाच गणपती मूर्तींचे विसर्जन ऑनलाइन पद्धतीने ठाण्यात केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून ठाणे महानगरपालिकेच्यावतीने  डिजीठाणे कोव्हिड-१९ डॅशबोर्ड च्या संकेतस्थळावर विसर्जनाचे टाइमस्लॉट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात विसर्जनाच्यावेळी गर्दी होऊ नये यासाठी ठाणे महानगरपालिकेने ऑनलाईन पद्धतीचा नागरिकांनी अवलंब करावा असं आवाहन केलं आहे. शुक्रवार १४ ऑगस्ट पासून ठाणेकरांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी www.covidthane.org या महानगरपालिकेच्या अधिकृत डिजीठाणे डॅशबोर्ड लिंकवर जाऊन Ganesh Visarjan Booking हे पर्याय निवडावा लागेल. यानंतर आपल्या प्रभागातील कृत्रीम तलावांची किंवा मुर्ती स्वीकृती केंद्रांची यादी बघून गणेश मूर्ती विसर्जनासाठी आपल्या जवळच्या विसर्जन स्थळाचा टाइमस्लॉट बुक करता येणार आहे. 

ठाणे महानगरपालिकेने गणेशोत्सव साधेपणे साजरा करावा यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. गणपती मूर्तीची उंची, किती जणांनी आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी व्हावे आदी नियम आखून दिलेले आहेत. त्याचे पालन करावे असं आयुक्तांनी आवाहन केलं आहे.

विसर्जनावेळी होणारी गर्दी लक्षात घेवून महापालिका क्षेत्रात यावर्षीही १३ ठिकाणी कृत्रीम तलावांची निर्मिती आणि  २० ठिकाणी मुर्ती स्वीकृती केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहेत. 


हेही वाचा -

'या' भागांमध्ये सेरो सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात

मुंबईत १ लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात, ११३२ नवे रुग्ण




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा