Advertisement

'या' भागांमध्ये सेरो सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात

वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) आणि बिगर शासकीय संस्था यांचं पथक हे सर्वेक्षण करणार आहे. हे पथक नागरिकांच्या घरी भेटी देऊन माहिती आणि रक्त नमुने गोळा करणार आहे.

'या' भागांमध्ये सेरो सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात
SHARES

मुंबई महापालिका माटुंगा, चेंबूर आणि दहिसर परिसरांत दुसऱ्या टप्प्यातील सेरो सर्वेक्षणाला आजपासून सुरुवात करणार आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) सूचनेनुसार, पालिकेनं हे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संक्रमणाची तीव्रता समजण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

ICMR च्या सुचनेनुसार, माटुंगा (एफ-उत्तर), चेंबूर (एम-पश्चिम) आणि दहीसर (आर-उत्तर) या भागातील झोपडपट्टय़ा आणि वसाहतींमध्ये १३ ते २८ ऑगस्ट या काळात सेरो सर्वेक्षण करण्यात येईल.

माटुंगा, चेंबूर आणि दहीसर या तिन्ही भागांतील झोपडपट्टय़ांमध्ये १३ ते २० ऑगस्ट दरम्यान, तर वसाहतींमध्ये १७ ते २८ ऑगस्टदरम्यान सेरो सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणादरम्यान दहिसरमधील इमारतींवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणाचा अहवाल तातडीनं उपलब्ध व्हावा यादृष्टीनं आखणी करण्यात आली आहे. साधारण एका आठवडय़ात अहवाल मिळू शकेल.

हेही वाचा : दहिसर , बोरिवली, कांदिवली आणि मालाडमधल्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या

तसंच सर्वेक्षणात माहिती आणि तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येणार आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांच्या नोंदी दोन स्वतंत्र अ‍ॅपमध्ये करण्यात येणार आहेत, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं.

सेरो सर्वेक्षणासाठी यापूर्वी पालिकेने ५०० जणांच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. या सर्वेक्षणातून सर्वसाधारणपणे लोकसंख्येमध्ये झालेल्या संक्रमणाचा भौगिलिक फैलाव समजून घेण्यास मदत होणार आहे. या सर्वेक्षणात १० हजार रक्त नमुने गोळा करण्यात येणार आहेत. नीती आयोग, ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फन्डामेंटल रिसर्च, मुंबई’ आणि अन्य संस्थांच्या सहकार्याने हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) आणि बिगर शासकीय संस्था यांचं पथक हे सर्वेक्षण करणार आहे. हे पथक नागरिकांच्या घरी भेटी देऊन माहिती आणि रक्त नमुने गोळा करणार आहे. कस्तुरबा सूक्ष्मजीव निदान वैद्यकीय प्रयोगशाळा, तसंच फरिदाबाद येथील ट्रान्सलेशलन हेल्थ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी इन्स्टिटय़ूटमध्ये हे नमुने पाठविण्यात येणार आहे. तेथे नमुन्यातील प्रतिपिंडांचे निदान करण्यात येणार आहे.हेही वाचा

माटुंगा, वांद्रे, दहिसरमध्ये पालिका करणार ‘सेरो’ सर्वेक्षण, 'हे' आहे कारण

मुंबईत हॉटस्पॉटमध्ये रक्ताचे नमुने घेण्यासाठी राष्ट्रीय सेरो सर्वेक्षण

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement