Advertisement

मुंबईत हॉटस्पॉटमध्ये रक्ताचे नमुने घेण्यासाठी राष्ट्रीय सेरो सर्वेक्षण

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव समजून घेण्यासाठी कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणी राष्ट्रीय सेरो सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

मुंबईत हॉटस्पॉटमध्ये रक्ताचे नमुने घेण्यासाठी राष्ट्रीय सेरो सर्वेक्षण
SHARES

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव समजून घेण्यासाठी कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणी राष्ट्रीय सेरो सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार 18 वर्षांवरील व्यक्तींचे रक्ताचे नमुने घेण्यात येणार आहेत. धारावी, कुर्ला, देवनार, साकीनाका, कांदिवली पूर्व व पश्चिम परिसरातील 500 व्यक्तींचे सर्वेक्षण डब्लूएचओ, स्थानिक वैद्यकीय अधिकारी आणि नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इम्युनो हिमॅटोलॉजी यांच्या सहभागाने करण्यात येणार असल्याचे पालिका आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

कोरोना संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव समजून घेण्यासाठी राष्ट्रीय सेरो सर्वेक्षण देशात हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणी करण्यात येत आहे. मुंबईतही अशा प्रकारचे सर्वेक्षण केले जाणार आहे. मुंबईतील कोरोनाच्या संक्रमणाचा कल समजून घेत त्यावर नियंत्रण मिळवणे हा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे. हे सर्वेक्षण प्रथम मूलभूत स्वरूपाचे असणार आहे. नंतर या सर्वेक्षणाच्या आणखी फेऱ्या होणार आहेत.

धारावी, कुर्ला, देवनार, साकीनाका, कांदिवली पूर्व व पश्चिम परिसरातील 500 व्यक्तींचे सर्वेक्षण होणार आहे. डब्लूएचओ, स्थानिक वैद्यकीय अधिकारी आणि नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इम्युनो हिमॅटोलॉजी यांनी देवनार, साकीनाका, कांदिवली पूर्व व पश्चिम ही ठिकाणे सर्वेक्षणासाठी निवडली आहेत. या ठिकाणच्या 500 व्यक्तींचे सर्वेक्षण केले जाणार असून संबंधित रहिवाशाची संमती घेतली जाणार आहे. संबंधित व्यक्तीच्या घरी गेल्यावर त्याच्या माहितीसह त्याच्या संपर्कातील अन्य व्यक्तींची माहिती घेण्यात येणार आहे. तसेच रक्ताचे नमुने गोळा करण्यात येणार आहेत.

रक्तात वाढ झाल्याचे स्पष्ट होणे म्हणजे संबंधित व्यक्ती कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याचे स्पष्ट होईल. आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रक्ताचे नमुने घेतल्यानंतर रक्तातील अँटीबॉडीजची  तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, या सर्वेक्षणाच्या माध्यमातून माहिती समोर आल्यानंतर कोरोनाचा फैलाव रोखणे व नियंत्रण मिळवणे या आधीच्या पद्धतीत बदल करणे शक्य होईल, असेही अधिकाऱ्याने सांगितले.



हेही वाचा -

राज्यात मान्सून ८ जूनपर्यंत दाखल होणार

कांदिवलीच्या कामगार रुग्णालयात १५० खाटांचं कोरोना रुग्णालय




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा