Advertisement

दहिसर , बोरिवली, कांदिवली आणि मालाडमधल्या कोरोना रुग्णांची संख्या

मालाडमध्ये सर्वात जास्त कोरोना रुग्ण...

दहिसर , बोरिवली, कांदिवली आणि मालाडमधल्या कोरोना रुग्णांची संख्या
SHARES

मुंबईसह महाराष्ट्रात (महाराष्ट्रात) कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. या भागातील लॉकडाऊनच्या नियमांचं पालिका आणि पोलिस प्रशासन काटेकोरपणे पालन करत आहेत.


मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरिवलीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यासह, पश्चिम उपनगरातील मालाडमध्ये देखील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

पालिकेनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ११ ऑगस्टपर्यंत मालाडमध्ये एकूण ७ हजार ४५४ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर दहिसरमध्ये ११ ऑगस्टपर्यंत कोरोनाचे ३ हजार १३३ रुग्ण आढळले आहेत. ११ ऑगस्टपर्यंत, बोरिवलीमध्ये कोरोनानं संक्रमित रुग्णांची एकूण संख्या ६ हजार ३०३ वर पोहोचली आहे. ११ ऑगस्टपर्यंत कांदिवली मधील कोरोना रूग्णांची एकूण संख्या ५ हजार ७२८ वर पोहोचली आहे.

हेही वाचा : ईशान्य मुंबईत ८३.११ टक्के रुग्ण कोरोनामुक्त

दरम्यान, मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात मंगळवारी कोरोने २५६ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत मंगळवारी दिवसभरात ९१७ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत मंगळवारी दिवसभरात ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

राज्यात बुधवारी १० हजार १४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ६८ हजार ४३५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६८.७९ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ११ हजार ८८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे, राज्यात सध्या १ लाख ४८ हजार ५५३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.



हेही वाचा

नवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन ४०७ रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी १८९ नवीन कोरोना रुग्ण

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा