Advertisement

ईशान्य मुंबईत ८३.११ टक्के रुग्ण कोरोनामुक्त

ईशान्य मुंबईतील कांजूर, विक्रोळी, भांडुप, नाहूर, पवई या भागात आता मुंबई महापालिकेला कोरोना नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे.

ईशान्य मुंबईत ८३.११ टक्के रुग्ण कोरोनामुक्त
SHARES

ईशान्य मुंबईतील कांजूर, विक्रोळी, भांडुप, नाहूर, पवई या भागात आता मुंबई महापालिकेला कोरोना नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे. येथील ८३.११ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

एस विभाग कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या कांजूर, विक्रोळी, भांडुप, नाहूर, पवई या भागाची जवळपास लोकसंख्या सव्वासहा लाख आहे.  येथे मार्चमध्ये पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर एप्रिलमध्ये १४१, मेमध्ये १,४१७, जूनमध्ये २,८९० रुग्णसंख्या होती.  येथील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी एस विभागाने तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली. घरोघरी केली जाणारी तपासणी, शिबीर, सामाजिक संस्थांचा पुढाकार, विलगीकरणासाठी केलेल्या उपाययोजना यामुळे वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आली.

या भागातील एकूण रुग्णसंख्या ६७८० होती. यातील ५६३५ रुग्ण बरे झाले आहेत. आता या भागात ७२० सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत ४२५ जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी सामाजिक संस्थांच्या मदतीने २०९ तपासणी शिबिरांमार्फत १५,८६३ जणांची तपासणी करण्यात आली.  

पालिकेच्या वैद्यकीय पथकांनी येथील घरांना भेटी देऊन ८,६२,२६४ जणांची तपासणी केली. या भागात १,५०७ व्यक्तींच्या प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या. तसंच २७ गल्ली शिबिरांचे आयोजन करण्यात आले.  

 


हेही वाचाः

Mumbai Rains : मुंबईत बुधवारी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज, तर 'या' जिल्ह्यांना इशारा

मुंबई लोकलमध्ये चोरीला गेलेलं पाकिट तब्बल १४ वर्षांनी सापडलं



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा