Advertisement

Mumbai Rains : मुंबईत बुधवारी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज, तर 'या' जिल्ह्यांना इशारा

येत्या दोन दिवसांत एक दोन ठिकाणी ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Mumbai Rains : मुंबईत बुधवारी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज, तर 'या' जिल्ह्यांना इशारा
SHARES

भारतीय हवामान विभागानं (आयएमडी) बुधवारी हलक्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय या आठवड्यात IMD नं Yellow Alert दिला होता. आता त्याची तीव्रता कमी झाली असून Alert Yellow हून Green अधोरेखीत करण्यात आला आहे. याचाच अर्थ मुंबईत या आठवड्यात हलका ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे.

येत्या दोन दिवसांत एक दोन ठिकाणी ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या जिल्हा चेतावणीनुसार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी शहरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शनिवारी IMD नं अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार Yellow Alert देखील दिला होता. ठाणे, पालघर आणि रायगडसाठी पिवळा इशारा अजूनही कायम आहे. केवळ मुंबईसाठी Green Alert देण्यात आला आहे.

हेही वाचा : कल्याणमध्ये सापडला दुर्मिळ दुतोंडी साप

"पश्चिम किनारपट्टी आणि घाट भागात ढगाळ वातावरण आहे. या भागांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रात येत्या २४ ते ४८ तासांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडणं अपेक्षित आहे," असं आयएमडीचे उपमहासंचालक (पश्चिम विभाग) के एस होसाळीकर यांनी सांगितलं.

IMDच्या सांताक्रूझ वेधशाळेमध्ये मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ५ मिमी पावसाची नोंद झाली. IMDनं मंगळवारी पालघर, ठाणे आणि रायगडमधील काही भागांमध्ये Yellow Alert दिला होता. मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. ठाण्यात मंगळवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान ७ मिमी पाऊस पडला.



हेही वाचा

अंधेरीत सापडलेल्या बिबळ्याची नैसर्गिक अधिवासात सुटका

सुंदर, मनमोहक ब्रम्हकमळ…

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा