Advertisement

सुंदर, मनमोहक ब्रम्हकमळ…

जुलै ते ऑगस्ट दरम्यानच्या काळात ही फुलं उमलतात. घरी या फुलांचं उमलणं हे शुभ मानलं जातं.

SHARES

ब्रम्हकमळ... सुंदर, मनमोहक असे हे फुल... कॅक्टस वर्गातील असलं तरी पाहताच क्षणी तुम्ही याच्या प्रेमात पडाल... क्वीन ऑफ नाईट असं देखील या फुलाला संबोधलं जातं. याचं कारण म्हणजे ते सर्वसाधारण फुलांच्या विपरित संध्याकाळी उमलायला लागतं, मध्यरात्री पूर्ण उमलतं आणि सकाळपर्यंत कोमेजून गळूनही पडतं.

गोरेगावतल्या नागरी निवारा इथं राहणारे धनाजी राऊळ यांच्या घरी हे ब्रम्हकमळ उमललं... जुलै ते ऑगस्ट दरम्यानच्या काळात ही फुलं उमलतात. घरी या फुलांचं उमलणं हे शुभ मानलं जातं. त्यामुळे घरात रात्री उमलेल्या या फुलांची पूजा देखील केली जाते.    





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा