Advertisement

अंधेरीत सापडलेल्या बिबळ्याची नैसर्गिक अधिवासात सुटका

अंधेरीतील जे. बी. नगरमध्ये सापडलेल्या बिबळ्याची संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील नैसर्गिक अधिवासात सुटका करण्यात आली आहे.

अंधेरीत सापडलेल्या बिबळ्याची नैसर्गिक अधिवासात सुटका
SHARES

अंधेरीतील जे. बी. नगरमध्ये सापडलेल्या बिबळ्याची संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील नैसर्गिक अधिवासात सुटका करण्यात आली आहे. या बिबळ्याला सोमवारी सकाळी जेरबंद करण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आलं होतं. (leopard spotted In mumbai andheri released in sanjay gandhi national park)

अंधेरीच्या मरोळ परिसरापर्यंत बिबळ्याचा वावर आता नेहमीचा झाला आहे. परंतु रविवारी जे. बी. नगरमधील स्थानिकांना बिबळ्याचं दर्शन झाल्यावर त्यांनी तातडीने विन विभागाशी संपर्क साधला होता. त्यानंतर वनविभागानेही तातडीने घटनास्थळी दाखल होत बिबळ्याचा शोध सुरू केला. रविवारी दिवसभर शोध घेऊनही बिबळ्या सापडला नाही. त्यानंतर सोमवारी सकाळी बिबळ्या पिंजऱ्यात अडकलेला आढळून आला. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेलं. तिथं त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अंदाजे ४ वर्षे वयाचा हा नर बिबळ्या तंदुरूस्त असल्याचं आढळून आल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं.  

हेही वाचाराणीबागेत आली बिबळ्या, कोल्ह्याची जोडी; लवकरच घडणार दर्शन

याआधी मरोळ विभागात एका बिबळ्याला पकडण्यात आलं होतं. जे. बी. नगरमध्ये आलेला बिबळ्या तोच आहे का? याची सध्या वन विभागाकडून पडताळणी सुरू आहे. एकदा पिंजऱ्यात अडकलेला बिबळ्या सहसा दुसऱ्यांदा पिंजऱ्यात अडकत नाही. त्यामुळे हा बिबळ्या दुसरा असावा, असाही तर्क लावला जात आहे. परंतु याआधी मरोळमध्ये पकडलेला बिबळ्या आणि आताचा बिबळ्या यांचे फोटो आणि शरीरावरील ठिपके तपासल्यावरच अधिक उलगडा होऊ शकेल, असं वन विभागातील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तोपर्यंत परिसरातील स्थानिकांनी दक्ष राहावं, अशा सूचना वन विभागाने दिल्या आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा