Advertisement

राणीबागेत आली बिबळ्या, कोल्ह्याची जोडी; लवकरच घडणार दर्शन

मंगळूर येथील पिलीकुलालू प्राणिसंग्रहालयातून बिबळ्या आणि कोल्ह्याची नर-मादीची जोडी सोमवारी २९ एप्रिल रोजी राणीबागेत दाखल करण्यात आली. बिबळ्या नराला ड्रोगन आणि मादीला पिंटो ही नावे मंगळूरच्या प्राणिसंग्रहालयानं दिली आहेत.

राणीबागेत आली बिबळ्या, कोल्ह्याची जोडी; लवकरच घडणार दर्शन
SHARES

भायखळा येथील वीर जिजामाता उद्यान अर्थात राणी बागेस भेट देणाऱ्या मुंबईसह देशविदेशातील पर्यटकांसाठी खूशखबर आहे. कारण, राणीच्या बागेत नवीन पाहुणे दाखल झाले आहेत. मंगळूर प्राणीसंग्रहालयातून बिबळ्या आणि कोल्ह्याची जोडी राणी बागेत दाखल करण्यात आली आहे. या प्राण्यांसाठी बांधल्या जाणाऱ्या पिंजऱ्यांची कामं अंतिम टप्प्यात असून ती पूर्ण होण्यास एक ते दीड महिना लागणार असल्याची माहिती मिळते. त्यानंतर मुंबईसह देश-विदेशातील पर्यटकांना बिबळ्या आणि कोल्ह्याचं दर्शन घडणार आहे.


२९ एप्रिलला दाखल

मंगळूर येथील पिलीकुलालू प्राणिसंग्रहालयातून बिबळ्या आणि कोल्ह्याची नर-मादीची जोडी सोमवारी २९ एप्रिल रोजी राणीबागेत दाखल करण्यात आली. बिबळ्या नराला ड्रोगन आणि मादीला पिंटो ही नावे मंगळूरच्या प्राणिसंग्रहालयानं दिली आहेत. पिंजऱ्याचं काम पूर्ण होईपर्यंत त्यांना खास बनवलेल्या व्क्वारेंटाईन कक्षामध्ये ठेवण्यात येणार असल्याचं समजतं. 


रोज ४ किलो मांस

या दोन्ही बिबळ्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बिबळ्यांना रोज ३ ते ४ किलो मांसाचा खुराक देण्यात येत आहे. वेगळ्या हवामानातून आल्यानं त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचं पथक लक्ष ठेवून आहे. बिबळ्या, कोल्ह्याच्या जोडीनंतर राणीबागेत लवकरच झेब्रा, जिराफ, चिंपांझी आणि फ्लेमिंगो असे परदेशी प्राणी व पक्षी येणार असून त्यांच्या निवासासाठी राणीबागेत तयारी सुरू करण्यात आली आहे.

या परदेशी पाहुण्यांबरोबरच गुजरातमधून पांढरा सिंह, औरंगाबादमधून वाघाची जोडी, तरस, अस्वल असे देशी प्राणीही येणार आहेत. वाघ आणि सिंहांसाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालयाकडं परवानगी मागण्यात आली आहे. वाघ येण्यास चार ते पाच महिने लागणार असून मे अखेरपर्यंत सिहांची जोडी राणी बागेमध्ये दाखल होणार आहे.


कामं अंतिम टप्प्यात

राणीबागेमध्ये परदेशी पाहुणे पाहायला मिळणार आहेत. जग्वार, चित्ता, पाणघोडा, वॅलेबी, झेब्रा, जिराफ, मॅड्रिल मंकी, ओकापी, इमू, शहामृग, चिपांझी, लेसर प्लेमिंगो, रिंगटेल लेमूर हे प्राणी आणले जाणार असून त्यांच्यासाठी पिंजरे तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. त्याशिवाय प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात वाघ, आशियाई सिंह, तरस, लांडगा, देशी अस्वल, बाराशिंगा, काकर, चितळ, नीलगाय, चौशिंगा, काळवीट, लहान मांजर, सांबर, चितळ, काकर हे प्राणी आणले जाणार आहेत. त्याचप्रमाणं पक्षीगृह आणि सर्पालयही तयार करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे.



हेही वाचा -

जेट कर्मचाऱ्यांचे कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त आंदोलन

कांदिवलीत बँकेच्या शौचालयात आढळला ढुरक्या घोणस



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा