Advertisement

जेट कर्मचाऱ्यांचे कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त आंदोलन

जेट एअरवेजचा तिढा सुटण्याची काहीच चिन्हं दिसत नसल्यामुळं जेटच्या कर्मचाऱ्यांमध्ये तणाव आहे. जेट एअरवेजच्या रोजगार गमावलेल्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुंबई विमानतळाजवळ आंदोलन केले. ऑल इंडिया जेट एअरवेज ऑफिसर्स अ‍ॅण्ड स्टाफ असोसिएशनतर्फे हे आंदोलन करण्यात आले.

जेट कर्मचाऱ्यांचे कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त आंदोलन
SHARES

जेट एअरवेजचा तिढा सुटण्याची काहीच चिन्हं दिसत नसल्यामुळं जेटच्या कर्मचाऱ्यांमध्ये तणाव आहे. जेट एअरवेजच्या रोजगार गमावलेल्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुंबई विमानतळाजवळ आंदोलन केले. ऑल इंडिया जेट एअरवेज ऑफिसर्स अ‍ॅण्ड स्टाफ असोसिएशनतर्फे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी जेट एअरवेज वाचविण्यासाठी सरकारनं हस्तक्षेप करण्याची मागणी केली. तसंच, जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल, त्यांच्या पत्नी, कंपनीतील वरिष्ठ पातळीवरील अधिकारी यांचे पासपोर्ट ताब्यात घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. पासपोर्ट जप्त केल्यावर त्यांना देशाबाहेर जाणे अशक्य होईल; त्यामुळे ही काळजी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.


आर्थिक स्थिती गंभिर

बुधवारी जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी मुंबईच्या टर्मिनल - २ (T2) येथं आदोलन केलं. मागील २ महिन्यांपासून पगार मिळाला नसल्यामुळं कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती गंभिर होत चालली आहे. त्याशिवाय, जेट एअरवेजनं गेल्या काही दिवसांत सर्व उड्डाणं बंद केल्या होत्या. तसंच, मेडिक्लेम पॉलिसी देखील काढून टाकली होती. त्यामुळं कर्मचाऱ्यांच्या त्रासात आणखीनच भर पडली आहे. गेल्या आठवड्यात जेट एअरवेजच्या एका वरिष्ठ तज्ञांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळते आहे.


१० मे रोजी बोली प्रक्रिया

जेट एअरवेजमधील गुंतवणुकीबाबत बोली प्रक्रिया १० मे रोजी होणार आहे. मात्र, त्यासाठी चार महत्वाच्या कंपन्यांपैकी तीन म्हणजे एटिहाद एअरवेज, टीपीजी कॅपिटल आणि इंडिगो पार्टनर्स या कंपन्यांनी नॉन-डिस्क्लोजर अॅग्रीमेंटवर स्वाक्षरी केलेली नाही.



हेही वाचा -

कांदिवलीत बँकेच्या शौचालयात आढळला ढुरक्या घोणस

राहुल शेवाळेंच्या पत्नी कामिनी यांना १ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा