मुंबई लोकलमध्ये चोरीला गेलेलं पाकिट तब्बल १४ वर्षांनी सापडलं

मुंबईतल्या एक लोकल प्रवाशाचं पाकिट २००६ मध्ये लोकलमधून प्रवास करताना चोरीला गेलं होतं. त्यांच हे पाकिट २०२० मध्ये सापडलं आहे.

मुंबई लोकलमध्ये चोरीला गेलेलं पाकिट तब्बल १४ वर्षांनी सापडलं
Pic credit: asian net news
SHARES

मुंबईत एखादी वस्तू हरवली तर ती पुन्हा सापडणं तसं अशक्यच. त्यात जर ती वस्तू रेल्वेत हरवली असेल तर मिळेल याची आशा ठेवणं म्हणजे निव्वळ मूर्खपणाच म्हणावा लागेल. पण प्रत्यक्षात याच्या विपरीतच घडलं. चक्क १४ वर्षांपूर्वी चोरीला गेलेली वस्तू एका लोकल प्रवाशाला पुन्हा मिळाली आहे. तुम्ही काय मी पण चकित झाली आहे. एक दोन महिने नाही तर चक्क १४ वर्षांनंतर एखादी वस्तू पुन्हा सापडणं म्हणजे चमत्कारासारखंच आहे.

हेमंत पडळकर यांचं पाकिट २००६ मध्ये CSMT हून पनवेल या लोकलमधून प्रवास करताना त्यांचं पाकिट चोरीला गेलं होतं. त्यावेळी त्यात एकूण ९०० रुपये होते. यावर्षी एप्रिल महिन्यात वाशी रेल्वे पोलिसांनी हेमंत पडळकर यांना फोन करुन त्यांचं 2006 मध्ये चोरीला गेलेलं पाकिट सापडल्याचं सांगितलं. १४ वर्षांपूर्वी हरवलेलं पाकीट सापडेल, अशी अपेक्षाच त्यांनी केली नव्हती. पण रेल्वे पोलिसांच्या अनपेक्षित फोनमुळे त्यांना सुखद धक्का बसला.

हेही वाचा : वाहन कर्ज घेताय, मग आधी ही बातमी वाचा

मात्र कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांना पाकीट आणता आलं नव्हतं. मात्र नियमांमध्ये काहीशी शिथिलता मिळाल्यानंतर पडळकर वाशीच्या जीआरपी कार्यालयात गेले. परंतु त्यांना पाकिटातील रकमेपैकी अर्धीच रक्कम परत मिळाली.

पडळकर म्हणाले की, माझं पाकीट हरवलं त्यावेळी त्यात ९०० रुपये होते. यामध्ये नोटाबंदीनंतर चलनातून हद्दपार झालेली ५०० रुपयांची नोटही होती. वाशीच्या रेल्वे पोलिसांनी मला ९०० रुपयांपैकी ३०० रुपये परत केले आणि १०० रुपये स्टॅम्प पेपरसाठी कापले. तर उरलेले ५०० रुपये नवीन नोट मिळाल्यानंतर परत करणार आहेत."

हेमंत पडळकर यांचं पाकीट चोरणाऱ्याला काही महिन्यांपूर्वीच अटक केल्याचं जीआरपी अधिकाऱ्यांनी सांगितलं. असो... १४ वर्षांनी का होईना पण पडळकर यांना त्यांचं चोरीला गेलेलं पाकिट सापडलं. या घटनेनंतर सर्वांच्याच आशा वाढल्या असतील. कधी ना कधी त्यांचं हरवलेलं सामान देखील पुन्हा सापडेल.हेही वाचा

शारिरीक तंदुरूस्तीसाठी पोलिसांना विश्रांती देणे गरजेचे

‘त्या’ हजार कोटी ड्रग्जच्या तस्करीमागे दिल्ली कनेक्शन

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय