वाहन कर्ज घेताय, मग आधी ही बातमी वाचा

सुरूवातीचे तीन महिने कर्जाचे हफ्ते भरण्यात आले. त्यानंतर कर्जाचे हफ्ते येणे बंद झाले. तसेच रजिस्ट्रेशन क्रमांक सारख्या कागदपत्रांची पूर्तताही करण्यात आली नाही.

वाहन कर्ज घेताय, मग आधी ही बातमी वाचा
SHARES

मुंबईत हल्ली वाहनं घेण हे काय अवघड राहिलं नाही, अधिकृ बँक किंवा फायनान्स वाले अवघ्या काही मिनिटात वाहनकर्ज देत आहेत. मात्र हे कर्ज घेताना खबरदारी घेणे हेही तितकेचं महत्वाचे आहे. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. नुकतीच अशी एक घटना बोरिवलीत उघडकीस आली आहे. चोरट्यांनी एका व्यक्तीला तब्बल सव्वा कोटी रुपयांना गंडवले आहे. या प्रकरणी बोरीवली पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कार डिलर कंपनीचे कर्मचारी व ग्राहक रघुनाथ राणे, गणेश उभारे, राहिल खान, अविध घरत, झेड. मद्रासवाला, शाही आलम व विशाल तिवारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचाः- संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग, उपचारासाठी जाणार...

बँकेचे व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीनुसार, २०१८ मध्ये तक्रारदार यांच्याकडे आला होता. त्याने अविध घरत याने पजेरो कार खरेदी केली असून त्यांना तीस लाख रुपयांचे वाहन कर्ज हवे असल्याचे सांगितले. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यानंतर २९ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज देण्यात आले. हे पैसे कार कंपनीच्या खात्यात जमा झाले. पण त्यानंतरही ग्राहक रघुनाथ राणेकडून कारचा नोंदणीकृत क्रमांक प्राप्त झाला नाही. बरेच दिवस झाल्यानंतरही वाहनाचा नोंदणी क्रमांक प्राप्त न झाला नाही. पुढे आणखी तीन ग्राहक झेड. मद्रासवाला, शाही आलम व विशाल तिवारी या तीन ग्राहकांसाठी कार डिलरकडून कर्जाचे अर्ज आले. त्यातही कागदपत्रांची पडताळणी करून २९.३४ लाख, २९.५५ लाख व २९.५५ लाख रुपयांचे कर्ज अनुक्रमे वितरीत करण्यात आले. सुरूवातीचे तीन महिने कर्जाचे हफ्ते भरण्यात आले. त्यानंतर कर्जाचे हफ्ते येणे बंद झाले.

हेही वाचाः- पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी १७९ नवीन कोरोना रुग्ण

तसेच रजिस्ट्रेशन क्रमांक सारख्या कागदपत्रांची पूर्तताही करण्यात आली नाही. त्यानंतर जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांची पुन्हा पडताळणी केल्यानंतर त्यातील काही कागदपत्र बोगस असल्याचे निष्पन्न झाले. तसेच अधिक चौकशी केली असता कार डिलर कंपनीच्या खात्यातून पैसे वैयक्तीक खात्यावर वळते करून त्याचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर कार डिलर कंपनीकडे तपासणी केली असता ग्राहकांना गाडी न आवडल्यामुळे त्यांनी गाडी घेतली नसल्याचे सांगितले. त्यानंतर कार डिलर कंपनीने त्या गाड्या विकून पैसे देण्याचे आश्वास दिले. पण ती रक्कम न मिळाल्यामुळे अखेर महिला बँक व्यवस्थापकाने याप्रकरणी बोरीवली पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार नुकतीच पोलिसांनी कट रचणे, बनावटीकरणे व फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिस अधिका-याने सांगितले

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा