शारिरीक तंदुरूस्तीसाठी पोलिसांना विश्रांती देणे गरजेचे

शारिरीक तंदुरुस्ती नसणे,कोरोना मृत्यूमागील प्रमुख कारण असल्याचे या अहवालात नमुद करण्यात आले आहे.

शारिरीक तंदुरूस्तीसाठी पोलिसांना विश्रांती देणे गरजेचे
SHARES

मुंबई पोलिसांमध्ये कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दिवस रात्र नागरिकांच्या रक्षणासाठी मुंबईच्या रस्त्यांवर आपला जीव धोक्यात घालून पोलिस कर्तव्य बजावत आहे. त्यामुळे त्यांची  शारिरीक तंदुरूस्ती लक्षात घेता, त्यांना विश्रांती मिळणे हे गरजेचे असल्याचे मुंबई पोलिसांच्या अहवालातून पुढे आले आहे. त्यामुळेच मुंबई पोलिस दलातील ४० वर्षांवरील पोलिसांना अधिक जोखीमीचे व कमी जोखिमीची कामे आलटून पालटून देणे हितकारक आहे. तसेच विषाणू संपर्क क्षेत्रातील कर्तव्यानंतर शरीराची प्रकृती सुधारण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा विश्रांती कालावधी देणे आवश्यक असल्याचीबाब मुंबई पोलिसांच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. शारिरीक तंदुरुस्ती नसणे,कोरोना मृत्यूमागील प्रमुख कारण असल्याचे या अहवालात नमुद करण्यात आले आहे.

हेही वाचाः- final year exams: अंतिम वर्षाच्या परीक्षांसंबंधी निर्णय घ्या, मुख्यमंत्र्यांची मोदींकडे पुन्हा एकदा मागणी

मुंबई पोलिस दलातील कोरोनाबाधीत पोलिसांवर अभ्यासपूर्ण सर्वेक्षण करण्यात आले असून त्यात मुंबई पोलिस दलासाठी काही शिफारसी करण्यात आल्या आहेत. या अहवालानुसार, महापालिकेचे दीड लाख कर्मचारी पोलिसांप्रमाणेच कोरोना योद्धांचे कर्तव्य बजावत आहेत. त्यात चतुर्थ श्रेणी कामगार व वैद्यकीय अधिका-यांचाही समावेश आहे. या दीड लाख कर्मचा-यांमागे १०८ कर्मचा-यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच्या तुलनेत ४६ हजारांच्या मुंबई पोलिस दलातील ५३ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. शारिरीक तंदुरुस्तीतील कमतरता हे त्याचे प्रमुख कारण आहे.  मुंबई पोलिसच्या सशस्त्र पोलिस दलात सर्वाधीक म्हणजे ९८४ पोलिसांना कोरोची बाधा झाली आहे. पण तेथे केवळ एकच  आहे. त्याच्या तुलनेत वाहतुक विभागात १९७ पोलिसांना कोरोनाची बाधी झाली होती. त्यातील सात पोलिसांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण १३ टक्के आहे. सशस्त्र पोलिस दलात तरुणांचा भरणा असल्यामुळे त्यांनी लवकर कोरोनावर मात केले. तुलनेत वाहतुक पोलिस दलात वयस्कर पोलिस व त्रासदायक कामांमुळे तेथे मृतांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अधिक जोखीमिची कामे  तरुणांना अधिक द्यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. याशिवाय एकावेळी संसर्ग क्षेत्रांत तैनात राहिल्यामुळे कोरोना लागण होण्याची शक्यता कमी आहे. वारंवार अशा संपर्कात आल्यामुळे कोरोना होण्याची शक्यता अधिक लक्षात घेता.

हेही वाचाः- संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग, उपचारासाठी जाणार...

३५ ते ४० वर्षांवरील पोलिसांना अधिक जोखमेचे व कमी जोखिमीची कामे आलटुन पालटून द्यावी. विषाणू संपर्क क्षेत्रातील कर्तव्यानंतर शरीराची प्रकृती सुधारण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा विश्रांती कालावधी देणे आवश्यक असल्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच वाहतुक पोलिसांचे त्रासदायक काम लक्षात घेता तेथे तरुण पोलिसांची नियुक्ती करावी, अशी शिफारही या सर्वेक्षणात करण्यात आहे.


मुंबई पोलिसांमधील कोरोनाबाबतचे प्रमुख मुद्दे

-सर्वाधीत म्हणजे ९८४ कोरोनाबाधीत पोलिस सशस्त्र पोलिस दलातील

- वाहतुक विभागाचा कोरोना मृत्यूदर सर्वाधिक(१३ टक्के)

-  ९८ टक्के बाधीत पोलिस कोरोना मुक्त झाले, अथवा स्थिती गंभीर नसलेले

-मुंबईचा मृत्यूदर ५.३ टक्के, तुलनेत पोलिसांचा मृत्यूदर १.३४ टक्के

- सर्वाधीत बाधीत पोलिस ठाणेः लोकमान्य टिळक(एल.टी) मार्ग(६५)

-सर्वाधीत बाधीत परिमंडळः परिमंडळ ९ ( वांद्रे, जुहू, पाली हिल परिसर) २२१ बाधीत पोलिस

-पश्चिम प्रादेशिक विभागात सर्वाधीत म्हणजे ५०८ बाधीत पोलिस

-गुन्हे शाखेत ११० पोलिस, तर आर्थिक गुन्हे शाखेत ३० पोलिसांना कोरोनाची बाधा

-गुप्तचर विभाग(विशेष शाखा-1) ४९ पोलिसांना कोरोनाची बाधा

-व्हीआपींच्या सुरक्षेत जबाबदारी असलेल्या संरक्षण व सुरक्षा विभागाच्या २३१ पोलिस बाधीत

-मोटर वाहतुक विभाग २१५ पोलिस बाधीत, वायरलेस विभाग ६५ पोलिस



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा