Exclusive मुंबईतल्या ९४ पोलिस ठाण्यात होणार ‘रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट’

५० टक्के कोरोनाबाधित पोलिस हे कंटेन्मेंट झोन परिसरात कर्तव्याला अथवा त्यांचे कार्यालय त्या परिसरात होते. तर ४५ टक्के मृत पोलिस कन्टेन्मेट झोन अथवा आसपासच्या परिसरातील राहणारे

Exclusive मुंबईतल्या ९४ पोलिस ठाण्यात होणार ‘रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट’
SHARES

मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिवस-रात्र प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत आहेत. हे प्रयत्न करताना अत्यावश्यक सेवेतील खास करून नागरिकांच्या वारंवार संपर्कात आलेल्या पोलिसांमध्ये कोरोना पसरण्याचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. पोलिसांमधील कोरोनाचे हे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आता मुंबई पोलिस दलातील ९४ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या ४५ ते ५५ वयोगटातील पोलिसांची ‘रॅपिड अँटीजेन डिटेक्शन  टेस्ट’ केली जाणार आहे.

हेही वाचा ः-मुंबईत एक कोरोना रुग्ण सापडल्यास संपूर्ण इमारत सील

देशभरात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. पण करोनाची चाचणी केल्यानंतर रिपोर्ट यायला अजूनही बराच वेळ लागतो. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नव्हते. काही वेळा चाचणीचा रिपोर्ट येण्याआधीच रुग्णाचे निधन होत असल्याचे प्रकार टाळण्यासाठी ‘इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने काही दिवसांपूर्वी रॅपिड अँटिजेन डिटेक्शन टेस्टला मंजुरी दिली. या चाचणीमुळे आता जलदगतीने करोना चाचणीचा रिपोर्ट मिळणे शक्य होत असून रुग्णाला वेळीच उपचारही मिळणार आहे.  महाराष्ट्र पोलिस दलात आज १७७३ कोरोनाचे अँक्टीवर रुग्ण आहेत. त्यात २०४ अधिकारी आणि १५६९ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर राज्यात ९० पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यात मुंबई पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. वेळीत या संसर्गाला आवरले नाही. तर परिस्थिती हाताबाहेर जाईल म्हणूनच मुंबई पोलिस दलात २४ जुलै ते २९ जुलै या कालावधीत मुंबई प्रादेशिकविभागातील परिमंडळानुसार  ‘रॅपिड अँटीजेन डिटेक्शन  टेस्ट’ची  टेस्ट केली जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत विभागीय सहाय्यक पोलिस आयुक्त यांची भूमिका ही संपर्क अधिकारी म्हणून महत्वाची राहणार आहे. वेळापत्रकानुसार विभागातील एकापोलिस ठाण्याच्या ठिकाणी हे शिबीर आयोजित केले जाणार आहे. या शिबीरात फक्त ४५ ते ५५ वयोगटातील पोलिसांची टेस्ट केली जाणार असून त्यात कुणी पाँझिटिव्ह आढळला. तर त्याला तातडीने पालिका किंवा शासकिय रुग्णालयात उपचारासाठी किंवा क्वारनटाइंन सेंटरमध्ये हलवले जाणार आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची चाचणी करून घेण्याचे काम हे संबधित वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर सोपवण्यात आले आहे.

हेही वाचा ः- मी इथंच बसलोय, सरकार पाडून दाखवा- उद्धव ठाकरे

मुंबई पोलिस दलात कोरोनाचे वाढते  प्रमाण लक्षात घेऊन त्या मागे नेमके कोणते कारण आहे. त्याचा अभ्यास करून एक अहवाल बनवण्यात आला. या अहवालात ५० टक्के कोरोनाबाधित पोलिस हे कंटेन्मेंट झोन परिसरात कर्तव्याला अथवा त्यांचे कार्यालय त्या परिसरात होते. तर ४५ टक्के मृत पोलिस कन्टेन्मेट झोन अथवा आसपासच्या परिसरातील राहणारे होते. तर उर्वरित पोलिसांमध्ये आजार उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या आजारपणांची लक्षणे आढळून आली. या अहवालात सर्वाधिक म्हणजे ३३.२४ टक्के रुग्ण ३१ ते४० वर्ष वयोगटातील होते. म्हणजे मुंबई पोलिस दलातील कोरोनाबाधीत तीन पोलिसां मागे एक रुग्ण हा ३१ ते ४० वर्ष वयोगटातील आहे. त्याच्या पाठोपाठ सुमारे २८ टक्के रुग्ण हे २० ते ३० वर्ष वयोगटातील आहेत. ४० ते ५० वर्ष वयोगटातील बाधीत पोलिसांची संख्या २२टक्के आहे, तर ५० वर्षांवरील कोरोना बाधीत रुग्णांची प्रमाण १७ टक्के आहे. मुंबई पोलिस दलात ३१ ते ४० वर्ष वयोगटातील कोरोना बाधीत पोलिसांची संख्या सर्वाधीत असली तरी, ८२ टक्के मृत पोलिस ५० वर्षांवरील आहेत यातील ४५ ते ५५ वयोगटातील पोलिसांना धोका सर्वाधिक असल्याने हे ‘रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट’ शिबीर घेण्यात आल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा ः- वाढत्या वीज बिलामुळं ग्राहक चिंतेत

१०५० कोरोना बाधीत पोलिस वैद्यकीय इतिहास नसलेले

कोरोना बाधीत पोलिसांच्या आकडेवारीचा विचार केला, तर १०५० बाधीत पोलिसांचा कोणताही वैद्यकीय इतिहास नाही. ४२ बाधीत पोलिसांना उच्च रक्तदाब, ४९ पोलिसांना मधुमेह होते. याशिवाय ३२ पोलिस उच्च रक्त दाब व मधुमेह दोनही आजार होते. चार पोलिसांना थायरॉईड, दोन पोलिसांना रक्तदाब व मधुमेह, १८ पोलिसांना रक्तदाब, एका पोलिसाला मधुमेह व सायरॉसिस, तर १५ पोलिसांना एन्जिओप्लास्टी, डायलिसिस, कर्करोग, मायग्रेन, क्षयरोग आदी व्याधी होत्या. १६०८ पोलिसांना वैद्यकीय पूर्व इतिहास उपलब्ध झाला नसून त्यातील बहुतांश पोलिसांना कोणताही वैद्यकीय पूर्वइतिहास नव्हता.

सर्वाधीत बाधीत पोलिस सशस्त्र पोलिस दलातील

मुंबई पोलिस दलातील कोरोना रुग्णांची संख्या पाहिली, तर सर्वाधीत म्हणजे ७८५ रुग्ण हे सशस्त्र पोलिस दलातील आहेत. त्याच्या पाठोपाठ पश्चिम प्रादेशिक परिमंडळातील ३७२पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यानंतर अनुक्रमे दक्षिण प्रादेशिक परिमंडळ ३४१, मध्य प्रादेशिक परिमंडळातील ३२३, उत्तर परिमंडळातील २११, पूर्व परिमंडळातील १८४, संरक्षण व सुरक्षा विभागातील १६४, मोटर वाहन विभागातील १४१, वाहतुक विभागातील १३३, गुन्हे शाखेतील ६७, वायरलेसमधील ३६, विशेष शाखा १ मधील ३४,  आर्थिक गुन्हे शाखेतील २१, विशेष शाखा २ मधील ९ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे.

रॅपिड अॅटिजेन डिटेक्शन टेस्ट म्हणजे काय?

या टेस्टमध्ये रुग्णाच्या नाकातून नमुने घेऊन अॅटिजेन शोधण्यात येतात. अँटिजेन म्हणजे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये मिसळलेला परदेशी पदार्थ. SARS-CoV-2 विषाणूमध्ये हा परदेशी घटक आढळतो. नेहमीच्या प्रयोगशाळेबाहेर ही अॅटिजेन डिटेक्शन टेस्ट करता येईल, तसेच रिझल्टही लगेच मिळेल.

आरटी-पीसीआर आणि अॅटिजेन टेस्टमध्ये फरक काय आहे?
सध्या RT-PCR टेस्टने करोना व्हायरसचे निदान केले जाते. RT-PCR प्रमाणेच अॅटिजेन डिटेक्शन टेस्टने शरीरामध्ये व्हायरसने शिरकाव केला आहे का? ते शोधून काढण्यात येणार आहे. दोन्ही चाचण्यांच्या पद्धतीमध्ये फरक आहे. RT-PCR टेस्टसाठी खास लॅबची आवश्यकता असते, पण अॅटिजेन डिटेक्शन टेस्टसाठी अशा लॅबची गरज भासत नाही. कारण किटसोबत असलेली उपकरणे पुरेशी आहेत. वेळ हा दोन्ही चाचण्यांमधला महत्वाचा फरक आहे. RT-PCR ने चाचणी केल्यानंतर चाचणीचा रिपोर्ट येण्यासाठी दोन ते पाच तासाचा कालावधी लागतो. पण तेच रॅपिड अॅटिजेन डिटेक्शन टेस्टमुळे रुग्ण करोना पॉझिटिव्ह आहे की, नाही ते अर्ध्या तासात समजेल. खासकरुन करोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये नियंत्रण मिळवण्यात या टेस्टिंगचा जास्त फायदा होईल.


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा