Advertisement

वाढत्या तापमानात मधुमेहींनी अशी घ्यावी काळजी


वाढत्या तापमानात मधुमेहींनी अशी घ्यावी काळजी
SHARES
Advertisement

मुंबईसह राज्यभरात सध्या तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हाचा त्रास लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच होतो. पण, अशा उन्हात बाहेर फिरत असताना उच्च रक्तदाब, मधुमेही रुग्णांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहीजे, असं मत मधुमेहतज्ज्ञ डॉ. रोशनी गाडगे यांनी व्यक्त केलं आहे.

बाहेर उन्हात असताना काय विशेष काळजी घेतली पाहिजे यावर मधुमहेतज्ज्ञ यांनी प्रकाश टाकला.

मधुमेहग्रस्तांनी बाहेर कुठल्याही कामासाठी जात असाल तर आपल्यासोबत पाण्याची बाटली ठेवायला विसरू नये. तसंच, गरजेची औषधं सोबत ठेवायला हवीत, असाही सल्ला डॉ. गाडगे यांनी दिला.


मधुमेहींसाठी काही खास टिप्स

ज्या रुग्णांना 'टाइप १' चा मधुमेह आहे, अशा रुग्णांनी बाहेर जाताना सोबत इन्सुलिनचं पाऊच ठेवणं आवश्यक
उन्हाळ्याच्या दिवसात इन्सुलिन ठेवण्यासाठी एका विशिष्ट तापमानाची आवश्यकता असते. अतिउष्णता असल्याने इन्सुलिन साठवण्यासाठी योग्य काळजी घ्यावी. नाहीतर हे इन्सुलिन खराब होऊ शकतं.

मधुमेही रुग्णांना शरीरातील साखरेचं प्रमाण तपासून आपल्यासोबत ग्लुकोमीटर, ग्लुकोस्ट्रीप्स, लिंबू-पाणी, मीठ-पाणी, कोकम सरबत (साखर विरहित) पेयं घेता येऊ शकतं.


हा त्रास होण्याची शक्यता

अति उच्च तापमानामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊन साखरेचं प्रमाण घटल्याने चक्कर येऊन रुग्ण कुठेही पडू शकतो. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना डिहायड्रेशनमुळे थेट किडनीवर परिणाम होण्याचीही शक्यता असते.

क्रिएटीनचं प्रमाण अधिक होऊन किडनी निकामी होण्याची शक्यता असते. जर रुग्ण उष्णतेमुळे अनवाणी चालत असेल तर त्याला अल्सर होऊ शकतो. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना पायांना उष्णतेचे फोड किंवा जळजळ होऊन त्या ठिकाणी जखम होऊ शकते. अशा जखमांवर वेळीच उपचार होणं गरजेचं आहे, अन्यथा सेप्टीक होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाढत्या उन्हात मधुमेहींनी सर्वात जास्त काळजी घेणं गरजेचं आहे.

संबंधित विषय
Advertisement