Advertisement

मेट्रो 1 च्या डब्यांची संख्या वाढणार

चार डब्यांच्या गाड्यांना प्रवाशांची वाढती संख्या व्यवस्थापित करण्यात अडचण येत आहे.

मेट्रो 1 च्या डब्यांची संख्या वाढणार
SHARES

मुंबईतील (mumbai) घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो 1 (Metro Line 1) मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या पाच लाखांपेक्षा जास्त असल्याने मोठी गर्दी होत आहे.

चार डब्यांच्या गाड्यांना प्रवाशांची वाढती संख्या व्यवस्थापित करण्यात अडचण येत आहे. विशेषतः सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत गर्दी मोठ्या प्रमाणात होते.

यावर उपाय म्हणून, मुंबई मेट्रो (mumbai metro) वन प्रायव्हेट लिमिटेडने (MMOPL) प्रत्येक गाडीत आणखी दोन कोच जोडण्याचा प्रस्ताव दिला आहे.

कंपनीने इंडिया डेट रिझोल्यूशन कंपनी लिमिटेड (IDRCL) मार्फत नॅशनल अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (NRCL) कडे यासाठीचा प्रस्ताव शेअर केला आहे.

जर याला मंजुरी मिळाली तर या विस्तारामुळे ट्रेनची क्षमता वाढेल आणि पूर्व-पश्चिम कॉरिडॉरवरील प्रवाशांच्या गर्दीचा ताण कमी होईल.

सध्या, प्रत्येक चार डब्यांच्या ट्रेनमध्ये सुमारे 1,750 प्रवासी प्रवास करतात. अंधेरी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि घाटकोपर सारख्या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी असते.

दोन अतिरिक्त कोच असल्यास प्रत्येक ट्रिपची क्षमता सुमारे 2,250 पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळे प्रवाशांना अधिक जागा मिळेल आणि गर्दीच्या वेळी व्यवस्थापन करण्यास मदत होईल.

आर्थिक अडचणींमुळे यापूर्वी विस्ताराला विलंब झाला होता. एमएमओपीएलला कर्जाच्या समस्यांचा सामना करावा लागला होता.

सहा बँकांचे 1,700 कोटींपेक्षा जास्त कर्ज असल्याने रक्कम परतफेड करण्यास असमर्थता जाहीर केली. यानंतर कंपनीने राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे (एनसीएलटी) धाव घेतली.

यानंतर पुनर्रचनेसाठी कर्ज एनएआरसीएलकडे हस्तांतरित करण्यात आले. आता, प्रस्तावित कोच जोडणीसाठी एनएआरसीएल आणि इतर वित्तीय संस्थांकडून मंजुरीची वाट पाहत आहे.



हेही वाचा

शिवसेना (यूबीटी)कडून स्थानिक स्तरावर मतदार ओळख केंद्रांची स्थापना

9 लाख नोकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारची गुंतवणूक

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा