Advertisement

वाढत्या वीज बिलामुळं ग्राहक चिंतेत


वाढत्या वीज बिलामुळं ग्राहक चिंतेत
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढत आहे. राज्याच्या तुलनेत मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मुंबईत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, मुंबईत मार्चमध्ये लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊनमूळ अनेक मुंबईकर तब्बल ३ महिन्यानंतर घराबाहेर पडले असून, कामाला लागले आहेत. मात्र, रोजगाराचा प्रश्न अजूनही मार्गी लागत नाही. त्यात महिन्याभरापासून शहरातील वीज बिलात अनावश्यक दरवाढ केली जात आहे. त्यामुळं महिन्याभराच्या आर्थिक खर्चात वाढ झाली. त्यामुळं बिलात अनावश्यक दरवाढ केली जात असल्याचा आरोप करून अनेक नागरिक सोशल मीडियावर पुढे आले होते. त्याशिवाय कलाकारांना ही या वाढत्या विजेच्या बिलाचा झटका बसला आहे.

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि अरशद वारसी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनाही अत्यल्प वीज बिल मिळाल्यामुळे नाराज आहेत. बेस्टच्या कारभारावर सर्वस्थरावरून टीका केली जात आहे. मात्र, याप्रकरणी ग्राहकांची फसवणूक केल्याचा दावा खासगी तसेच सरकारी वीज कंपन्यांनी फेटाळून लावला आहे. 

यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुढे आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सर्व वीज कंपन्यांना तक्रारी पारदर्शकपणे सोडविण्याचे निर्देश दिले आहेत. मिळलेल्या माहितीनुसार, 

निवासी ग्राहकांसाठी वीज शुल्क १६ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या मागणीसाठी ग्राहक व कार्यकर्ते पुढे आले आहेत. ग्राहकांनी आपल्या मागण्या मांडण्यासाठी राज्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली. तसंच त्यांना निवेदन देत लॉकडाऊनपर्यंत सरकारने वीज शुल्क कमी करावेत अशी मागणी केली.

कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे आणि देशात बेरोजगारीचे प्रमाण जवळपास दुप्पट आहे. यामुळं शहरातील वीज शुल्कामध्ये कपात करणे फायद्याचे ठरू शकते.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा