Advertisement

खाजगी कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या COVID 19 टेस्टची परवानगी, 'या' आहेत अटी

राज्याने खासगी कंपन्यांना कोरोनाव्हायरससाठी त्यांच्या कर्मचार्‍यांची चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. यासाठी काही अटींचं पालन करावं लागेल.

खाजगी कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या COVID 19 टेस्टची परवानगी, 'या' आहेत अटी
SHARES

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, राज्याने खासगी कंपन्यांना कोरोनाव्हायरससाठी त्यांच्या कर्मचार्‍यांची चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. पण यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींचं पालन करूनच खाजगी कंपन्या टेस्ट करू शकतात.

राज्यानं दिलेल्या अधिसूचनेनुसार किमान ५० कर्मचार्‍यांची कोरोना टेस्ट घ्यावी लागेल. एखाद्याची चाचणी घेण्यापूर्वी एक अर्ज प्रशासन प्रमुख किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा लागेल. ज्यात चाचणीचा तपशील घ्यावा लागेल. जर टेस्टसाठी कंपनीनं एखादी लॅब ठरवली असेल तर त्याची देखील माहिती द्यावी. अशाप्रकारची सर्व माहिती अर्जात नमूद केलेली पाहिजे.

ठाणे प्रशासनानं काही खासगी लॅब्सना कोरोनाव्हायरसची चाचणी सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे सध्या टेस्टींगची संख्या देखील वाढली आहे. सध्या दिवसाला ९०० ते १२०० इतक्या चाचण्या केल्या जातात.


कल्याण-डोंबिवलीतील मोबाइल क्रमांकासह 'ही' आहे अ‍ॅम्बुलन्सची यादी


दरम्यान, खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी आता डॉक्टरांच्या चिठ्ठीची (प्रिस्क्रिप्शन) गरज भासणार नाही. त्यामुळे लक्षणे असलेल्या व्यक्तीला आता थेट कोरोनाची चाचणी करता येणार आहे. मुंबई महापालिकेने याबाबतचा नवीन नियम जाहीर केला आहे.

आतापर्यंत खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोनाची चाचणी करण्यासाठी डॉक्टरची चिठ्ठी बंधनकारक होती. पण आता पालिकेच्या नव्या नियमानुसार, कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तीला खासगी प्रयोगशाळेत डाॅक्टरांच्या चिट्टीटी गरज भासणार नाही. तसंच प्रयोगशाळेपर्यत पोहोचू न शकणाऱ्या ज्येष्ठ व्यक्ती किंवा इतर आजारांच्या व्यक्तींच्या चाचण्या घरी जाऊन करण्याची परवानगीही पालिकेने खासगी प्रयोगशाळांना दिली आहे.

सध्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या आकड्यात भारतानं चीनला देखील मागे टाकलं आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ८५ हजार ७२४ झाली आहे. तर चीनमध्ये हा आकडा ८५ हजार ३२० आहे. चीनमध्ये ४ हजार ६४८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मुंबईतील कोरोना मृत्यूंची संख्या ४ हजार ९३८ आहे.



हेही वाचा

धारावी, अंधेरी, कुर्लामध्ये सर्वाधिक कोरोना मृत्यू

Exclusive : गोरेगाव ते दहिसर भागात COVID 19 रुग्णांसाठी डायलिसिसची सुविधा नाही

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा