Advertisement

कोरोना रुग्ण संख्येत मुंबईने चीनला मागं टाकलं

जगभर कोरोनाचा फैलाव करणाऱ्या चीनला आता मुंबईने कोरोना रुग्णांच्या संख्येत मागे टाकलं असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

कोरोना रुग्ण संख्येत मुंबईने चीनला मागं टाकलं
SHARES

जगभर कोरोनाचा फैलाव करणाऱ्या चीनला आता मुंबईने कोरोना रुग्णांच्या संख्येत मागे टाकलं असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ८५ हजार ७२४ झाली आहे. तर चीनमध्ये हा आकडा ८५ हजार ३२० आहे.  चीनमध्ये ४ हजार ६४८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मुंबईतील कोरोना मृत्यूंची संख्या ४ हजार ९३८ आहे.


कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. पण त्यानंतरही देशभरासह मुंबईत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.  भारताने तर कोरोना रुग्णांच्या संख्येत जगात तिसरे स्थान पटकावले आहे. आता मुंबईने कोरोनाग्रस्तांच्या संख्येत चीनलाही मागे टाकले आहे. चीनमध्ये एकूण ५०० ते ६०० रुग्ण सक्रिय आहेत. तर मुंबईत सध्या २३ हजार ६२४ रुग्ण सक्रिय आहेत. 


भारतात अवघ्या ५ दिवसांमध्ये कोरोनाचे १ लाख नवे रुग्ण वाढले. त्यात सलग ३ दिवस दररोज २० हजारांहून अधिक रुग्णवाढ झाली. भारतात कोरोना रुग्णांची संख्या ७ लाख १९ हजार ६६५ वर गेली आहे. यामधील ४ लाख ३९ हजार ९४८ जण बरे झाले आहेत. तर देशात २० हजार १६० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.हेही वाचा -

Hotel & Restaurant: राज्यात ८ जुलैपासून हाॅटेल-लाॅज उघणार, रेस्टाॅरंटबाबत निर्णय प्रलंबित

डोमिसाईल असेल तरच नोकरीची संधी, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा