Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,87,521
Recovered:
57,42,258
Deaths:
1,18,795
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,453
570
Maharashtra
1,23,340
8,470

डोमिसाईल असेल तरच नोकरीची संधी, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवार ६ जुलै २०२० रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ‘महाजॉब्स पोर्टल’चं उद्घाटन करण्यात आलं.

डोमिसाईल असेल तरच नोकरीची संधी, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
SHARES

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवार ६ जुलै २०२० रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ‘महाजॉब्स पोर्टल’चं (http://mahajobs.maharashtra.gov.in) उद्घाटन करण्यात आलं. रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांनी आपली माहिती महाजॉब्स पोर्टलवर अपलोड केल्यानंतर विविध कंपन्यांकडून इच्छुकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल. परंतु इच्छुकांना ही नोंदणी करताना स्थानिक वास्तव्याचं प्रमाणपत्र (डोमिसाईल) आवश्यक असेल. त्यामुळे या पोर्टलच्या माध्यमातून स्थानिक बेरोजगारांना आपोआपच प्रधान्याने रोजगाराची संधी उपलब्ध (domicile certificate mandatory to register maharashtra government mahajobs portal ) होईल, अशी माहिती यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आपण उद्योगधंदे सुरू करायला परवानगी दिलेली आहे. जिथं कारोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तिथं काही भागांमध्ये आपण थोडासा ब्रेक लावलेला आहे. आपण उद्योगधंदे सुरू करायला परवानगी दिली, नवीन उद्योजकांना आपण बोलवत आहोत. नवीन गुंतवणूक आणत आहोत. नवीन सुरूवात आपण करत आहोत. परराज्यातील मजूर आपापल्या घरी निघून गेले आहेत. काही यायला सुरूवात झाली आहे. काही येणे बाकी आहेत. म्हणजे आपल्याकडे आज नोकऱ्या उपलब्ध आहेत. कारखान्यांमध्ये काम आहे, परंतु कामगार नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा - Hotel & Restaurant: राज्यात ८ जुलैपासून हाॅटेल-लाॅज उघणार, रेस्टाॅरंटबाबत निर्णय प्रलंबित

कोरोनाच्या संकटात बरेच उद्योजक वेतनकपात आणि कामगार कपात करत आहेत. एका बाजूला आपण उद्योजकांना आमंत्रित करतो, गुंतवणुकीला आकर्षित करतो. महाजाॅब्ज पोर्टल निर्माण करतो, जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण होईल, त्यासाठी प्रयत्न करत आहोत. अशा स्थितीत कामगारांची कपात करणं योग्य नाही. आपण सुरू केलेलं महाजाॅब्स पोर्टल ही काळाची गरज आहे. कारण नोकऱ्या शोधायच्या कुठे आणि किती? मग नोकऱ्या लागताना पुन्हा वशिला येतो. आजपासूनच आपली यंत्रणा पारदर्शक असली पाहिजे. अत्यंत प्रामाणिकपणे आपण इथं रोजगार आणि नोकऱ्या मिळवून देण्याचं काम केलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

महाजाॅब्स, महाराष्ट्र म्हटल्यावर आपलं काम मोठं असलं पाहिजे, जे करू ते भव्यदिव्य करू. महाराष्ट्र हा इतर राज्यांच्या तुलनेत नेहमीच एक पाऊल पुढं आहे. विकास म्हणजे जिथल्या तिथं रोजगार मिळाला पाहिजे. रोजीरोटी मिळाली पाहिजे, घर मिळालं पाहिजे. हे जर आपण एकत्र करून जर आपण पुढं जात असू तर आपण निश्चितच विकासाच्या दिशेने चाललो आहोत, असं म्हणायला हरकत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.  

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा