Advertisement

मुंबईत एक कोरोना रुग्ण सापडल्यास संपूर्ण इमारत सील

मुंबईत याआधी झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत होते. त्या तुलनेत सोसायट्यांमधील रुग्णांची संख्या खूपच कमी होती. मात्र, आता उलटं चित्र दिसत आहे.

मुंबईत एक कोरोना रुग्ण सापडल्यास संपूर्ण इमारत सील
SHARES

मुंबईत बोरीवली, दहिसर आणि कांदिवलीत कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढतच आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने या ठिकाणांसह पश्चिम उपनगरात एक जरी कोरोना रुग्ण सापडला तरी इमारत किंवा इमारतीची संपूर्ण विंग सील करण्याचा निर्णय घेतला आहे. 


मुंबईत याआधी झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत होते. त्या तुलनेत सोसायट्यांमधील रुग्णांची संख्या खूपच कमी होती. मात्र, आता उलटं चित्र दिसत आहे. आता सोसायट्यांमध्ये ७० टक्के तर झोपडपट्ट्यांमधून ३० टक्के रुग्ण आढळून आले आहेत.  त्यामुळे सोसायटीतील कोरोना रुग्णांची हिस्ट्री शोधून या इमारती सील करण्यात येणार येणार असल्याचं पालिकेचे परिमंडळ ७चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी सांगितलं.


मात्र, एक रुग्ण सापडला तरी संपूर्ण सोसायटी सील करण्याच्या पालिकेच्या निर्णयावर रहिवाशांनी नाराजी दर्शवली आहे.  ज्या सोसायटीत १०० हून अधिक फ्लॅट्स असतील त्या सोसायटीतील नागरिकांना बाहेर ये-जा करण्यास मोठी गैरसोय होऊ शकते, असं त्यांचं म्हणणं आहे. एका रुग्णासाठी अनेक फ्लॅट्स सील करणे पूर्णपणे नियमबाह्य आहे, असंही रहिवाशांचं म्हणणं आहे. 



हेही वाचा -

राज्यात ९८९५ कोरोना रुग्णांची दिवसभरात नोंद, पाहा तुमच्या भागातील रुग्णांची संख्या किती

मुंबईत कोरोनाचे १२५७ नवे रुग्ण, ५५ जणांचा दिवसभरात मृत्यू




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा