plasma therapy unit: सचिन तेंडुलकरच्या हस्ते प्लाझ्मा डोनेशन सेंटरचं उद्घाटन

प्लाझ्मा थेअरपी ही नागरिकांसाठी जीवनदान ठरत असल्याने राज्य सरकारने या थेअरपीला परवानगी दिली आहे.

plasma therapy unit: सचिन तेंडुलकरच्या हस्ते प्लाझ्मा डोनेशन सेंटरचं उद्घाटन
SHARES

भारतरत्न आणि भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडूलकर यांच्या हस्ते मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या प्लाझ्मा डोनेशन सेंटरचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. ' कोरोनावर मात केलेल्या रूग्णांनी प्लाझ्मा थेरपीसाठी रक्तदान करण्याकरिता पुढे यावे. एक भारतीय दुसर्‍या भारतीयाच्या मदतीसाठी पुढे येणं यापेक्षा सध्या दुसरी कोणतीच मोठी मदत नाही.' असे आवाहन सचिनने नागरिकांना केले आहे. कोरोनाववर अद्याप कोणतेही औषध समोर आले नसून प्लाझ्मा थेअरपी ही नागरिकांसाठी जीवनदान ठरत असल्याने राज्य सरकारने या थेअरपीला परवानगी दिली आहे.

हेही वाचाः- Coronavirus Patients : मुंबईच्या 'या' परिसरात कमी रुग्णसंख्या

कोरोना विषाणूवर अद्याप कोणतीही लस नाही. मात्र, प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णांसाठी आशादायी ठरत आहे. कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात येते. २८ दिवसांनतर कोरोनाबाधित रुग्णाची चाचणी निगेटीव्ह आल्यानंतरच त्याच्यावर प्लाझ्मा थेरपीची चाचणी केली जात आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्चच्या गाईडलाइनुसार ही चाचणी करण्यात येते. ही चाचणी करताना कोविड-१९ वर मात केल्यानंतर रूग्णाच्या शरीरात तयार होणार्‍या अ‍ॅन्टी बॉडीज काढल्या जातात. रक्तदानामधून प्लाझ्मा वेगळा केला जातो आणि अत्यावस्थ रूग्णाला तो चढवला जातो. दरम्यान यासाठी ICMR ची कडक नियमावली आहे. त्याच्या अखत्यारिमध्ये राहूनच हॉस्पिटलला ही प्लाझ्मा थेरपीची मुभा देण्यात आली आहे. या प्लाझ्मा थेअरपीमुळे रुग्णाच्या शरीरातली रोग प्रतिकारशक्ती वाढून तो रुग्ण बरा होतो. यानुसार पालिकेने मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात प्लाझ्मा केंद्र सुरू केले आहे. याशिवाय पालिकेच्या शीव, केईएम, कस्तुरबा रुग्णालयासह, राज्य सरकारच्या अखत्यारीतील जे.जे. रुग्णालयातही प्लाझा थेरपीची कार्यवाही सुरू करण्यास माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी परवानगी दिली होती.

हेही वाचाः- CBSE चा मोठा निर्णय, 'या' विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ३० टक्के कमी करणार

दरम्यान मुंबईच्या सेव्हन हिल रुग्णालय हे सध्या कोविड स्पेशल रुग्णालय म्हणून घोषीत केले आहे. या ठिकाणी रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेअरपी सुरू करण्यात आली होती. दरम्यान रुग्णालयात प्लाझ्मा डोनेशन सेंटरचे काम युद्धपातळीवर सुरू होते. काहीदिवसांपूर्वीच या सेंटरचे काम पूर्ण झाले होते. त्यामुळे बुधवारी भारताचा माजी खेळाडून सचिन तेंडूलकरच्या हस्ते या सेंटरचे उद्धाटन करण्यात आले. महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वीच ‘प्रोजेक्ट प्लॅटिना' या प्लाझ्मा थेरपी उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले आहे. दरम्यान यामध्ये प्लाझ्मा डोनेशन, प्लाझ्मा बँक, प्लाझ्मा ट्रायल आणि इमर्जन्सी ऑथरायजेशन या चार सुविधांचा समावेश आहे. या प्रोजेक्टद्वारा उपचार पद्धतीचा सर्वंकष विकास व वापर करून आणि संकलित होणाऱ्या माहितीच्या विश्लेषणातून कोविड विषाणूचे औषध व लस शोधण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचं सांगण्यात आले आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा