Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,97,587
Recovered:
57,53,290
Deaths:
1,19,303
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,577
863
Maharashtra
1,21,859
10,066

Coronavirus Patients : मुंबईच्या 'या' परिसरात कमी रुग्णसंख्या

दररोज १ हजारांच्या आसपास रुग्णसंख्या ही मुंबईत आढळत आहे. मात्र असं असलं दक्षिण मुंबईच्या काही परिसरात रुग्णसंख्या कमी होत आहे.

Coronavirus Patients : मुंबईच्या 'या' परिसरात कमी रुग्णसंख्या
SHARES

कोरोना या जीवघेण्या व्हायरसनं संपूर्ण मुंबईला चांगलेच टार्गेट केलं आहे. दररोज १ हजारांच्या आसपास रुग्णसंख्या ही मुंबईत आढळत आहे. मात्र असं असलं दक्षिण मुंबईच्या काही परिसरात रुग्णसंख्या कमी होत आहे. दक्षिण मुंबईतील उमरखाडी, डोंगरी, मशीद बंदरचा भाग असलेल्या बी विभागात रोज कमी रुग्णांच्या नोंदी होत आहेत. तर गिरगाव, मुंबादेवीचा भाग असलेल्या सी भागातही रुग्ण वेगाने बरे होत असून सक्रिय रुग्णांची संख्या खूपच कमी झाली आहे.

मुंबईच्या अनेक विभागात रुग्णसंख्या ४ हजाराहुन अधिक आहे. मात्र, बी विभागात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजाराच्या आत आहे. या भागातील एकूण रुग्णांची संख्या केवळ ८०३ असून, नव्यानं रुग्ण सापडण्याचे प्रमाणही खूप कमी झाले आहे.

दक्षिण मुंबईतील मोहम्मद अली रोड, भेंडीबाजार, पायधुनी, मशीद बंदर, उमरखाडी हा दाटीवाटीचा भाग असून, या परिसरात नेहमीच नागरिकांची विक्रेत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. येथील अनेक परिसर हे होलसेल मार्केट म्हणून प्रसिद्ध असल्यानं आणखी गर्दी इथं होते. मात्र, सध्या कोरोनामुळं ही परिसरं रिकामी पाहायला मिळत आहेत. 

हे परिसर दाटीवाटीचे असले तरी या करोनामुक्तीच्या वाटेवर आहे. या भागातून आतापर्यंत ५१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या केवळ २२१ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या विभागाचा रुग्ण दुप्पट होण्याचा वेग ८८ दिवसांवर आहे. तर ६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी राज्यात कोरोनाचे २२४ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात ८०६ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत मंगळवारी दिवसभरात ६४ जणांचा मृत्यू झाला आहे.

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत मंगळवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६४ रुग्ण दगावले आहेत. तर ६ जुलै रोजी ३९ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ५ जुलै रोजी एकूण ६९ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

मंगळवारी मुंबईत कोरोनाचे ८०६ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ८६ हजार १३२ इतकी झाली आहे. तर मुंबईत मंगळवारी दिवसभरात ९८५ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ५८ हजार १३७ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.हेही वाचा - 

मुंबईत कोरोनाचे ८०६ नवे रुग्ण, ६४ जणांचा दिवसभरात मृत्यू

violating lockdown in Maharashtra नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी १ लाख ५४ हजार जणांवर गुन्हे दाखलRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा