violating lockdown in Maharashtra नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी १ लाख ५४ हजार जणांवर गुन्हे दाखल

पोलिसांवर हल्ला होण्याच्या २९६ घटना घडल्या. त्यात ८६३ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

violating lockdown in Maharashtra नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी १ लाख ५४ हजार जणांवर गुन्हे दाखल
SHARES

महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ऐकीकडे प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत असताना. दुसरीकडे नियमांचे उल्लंघन करत नागरिक बिनदिक्कत रस्त्यावर फिरत असल्याने पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार  १ लाख ५४ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

हेही वाचाः- Coronavirus pandemic : राज्यात दिवसभरात कोरोनाचे ५१३४ नवे रुग्ण, २२४ जणांचा मृत्यू

 राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे २२ मार्च ते ६ जूलै  या कालावधीत  कलम १८८ नुसार  १ लाख ५४ हजार ४५२ गुन्हे नोंद झाले असून २९ हजार ७९२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी  ५ लाख ६३ हजार ४६५  पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही टवाळ खोर पोलिसांवर हल्ला करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २९६ घटना घडल्या. त्यात ८६३ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

हेही वाचाः- मुंबईत कोरोनाचे ८०६ नवे रुग्ण, ६४ जणांचा दिवसभरात मृत्यू

राज्यात कुणालाही मदत हवी असल्यास त्यांच्या तोंडात पहिल्यांदा नाव हे पोलिसांचे येते. नागरिकांच्या सेवेसाठी  पोलिसांनी २४ तास शंभर नंबरची सेवा सुरू केली आहे. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर  १ लाख ०५ हजार ९८५फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ८०१ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. अशी माहिती देशमुख यांनी दिली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३३५ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व राज्यात  ८८,७५७ वाहने जप्त करण्यात आली.

पोलिस कोरोना कक्ष

 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील ४१ पोलीस व २ अधिकारी अशा एकूण ४३, पुणे ३, सोलापूर शहर ३, नाशिक ग्रामीण ३,नाशिक शहर १, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे ४, ठाणे शहर ४ व ठाणे ग्रामीण १ व १ अधिकारी, जळगाव ग्रामीण १,पालघर १, रायगड १,जालना SRPF १ अधिकारी , अमरावती शहर १ wpc,उस्मानाबाद १, नवी मुंबई  SRPF १ अधिकारी अशा ७१ पोलिस बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या ११८ पोलीस अधिकारी व ९७१ पोलीस कोरोना  बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


संबंधित विषय