Advertisement

मुंबईत कोरोनाचे ८०६ नवे रुग्ण, ६४ जणांचा दिवसभरात मृत्यू

तर मुंबईत मंगळवारी दिवसभरात ९८५ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ५८ हजार १३७ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचे ८०६ नवे रुग्ण, ६४ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे २२४ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात ८०६ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत मंगळवारी दिवसभरात ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः- अरे व्वा! धारावीत दिवसभरात सापडला फक्त एक कोरोना रुग्ण

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत मंगळवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६४ रुग्ण दगावले आहेत. तर ६ जुलै रोजी ३९ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ५ जुलै रोजी एकूण ६९ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, मंगळवारी मुंबईत कोरोनाचे ८०६ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ८६ हजार १३२ इतकी झाली आहे. तर मुंबईत मंगळवारी दिवसभरात ९८५ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ५८ हजार १३७ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- CBSE चा मोठा निर्णय, 'या' विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ३० टक्के कमी करणार

राज्यात सलग पाचव्या दिवशी तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५४ टक्क्यांवर कायम असून आज ३२९६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यत एकूण संख्या १ लाख १८ हजार ५५८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ५१३४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ८९ हजार २९४ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ११ लाख  ६१ हजार ३११ नमुन्यांपैकी २ लाख १७ हजार १२१ नमुने पॉझिटिव्ह (१८.६९ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ३१ हजार ९८५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ४६३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २२४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. राज्यातील मृत्यूदर ४.२६ टक्के एवढा आहे. राज्यात नोंद झालेले २२४ मृत्यू हे मुंबई मनपा-६४ठाणे-७,ठाणे मनपा-१३नवी मुंबई मनपा-२कल्याण-डोंबिवली मनपा-१३उल्हासनगर मनपा-५भिवंडी निजामपूर मनपा-३मीरा-भाईंदर मनपा-११पालघर-२वसई-विरार मनपा-८पनवेल मनपा-९नाशिक-४नाशिक मनपा-९अहमदनगर-१धुळे-१धुळे मनपा-१जळगाव-५जळगाव मनपा-३पुणे-९पुणे मनपा-२७पिंपरी-चिंचवड मनपा-१सोलापूर-३सोलापूर मनपा-७सातारा-१औरंगाबाद-१औरंगाबाद मनपा-४जालना-२लातूर-२लातूर मनपा-१उस्मानाबाद-१यवतमाळ-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे तसेच इतर राज्य १ अशी नोंद आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा