Advertisement

अरे व्वा! धारावीत दिवसभरात सापडला फक्त एक कोरोना रुग्ण

कवेळ अशी होती की तिकडे दिवसाला १०० हून अधिक रुग्ण सापडायचे. पण हॉटस्पॉट ठरलेल्या याच धारावीत दिवसभरात १ रुग्ण सापडला आहे.

अरे व्वा! धारावीत दिवसभरात सापडला फक्त एक कोरोना रुग्ण
SHARES

मुंबईतील COVID 19 चा हॉटस्पॉट म्हणून धारावीचा (Dharavi News) उल्लेख अगदी काही दिवसांपर्यंत केला जात होता. पण आता तिथली परिस्थिती पूर्ण बदलली आहे. एकवेळ अशी होती की तिकडे दिवसाला १०० हून अधिक रुग्ण सापडायचे. पण हॉटस्पॉट ठरलेल्या याच धारावीत दिवसभरात १ रुग्ण सापडला आहे. 

धारावीतील आतापर्यंतची ही सर्वांत कमी संख्या आहे. घराघरात जाऊन केलेलं स्क्रीनिंग, संशयितांचं विलगीकरण आणि काँटॅक्ट ट्रेसिंग यामुळे धारावीसारख्या अवघड वाटणाऱ्या भागात साथ आटोक्यात आली आहे. त्यामुळे मुंबईसोबतच तिथल्या नागरिकांसाठी ही एक गूड न्यूजच आहे.

मुंबईतील Corona रुग्णसंख्या आटोक्याबाहेर जात आहे, असं दिसत असतानाच मुंबईचे प्रशासक बदलले. इक्बाल चहल यांच्याकडे आयुक्तपद आलं. त्यांनी धारावीत यापूर्वीही काम केलेलं असल्यानं त्यांना योग्यरित्या परिस्थिती हाताळणं सोपं गेलं. आयुक्तपदाची जबाबदारी घेताच त्यांनी दाटीवाटीच्या भागातला संसर्ग नियंत्रणात आणण्याचं काम हाती घेतलं. त्यासाठी त्यांनी स्वत: जाऊन सर्व परिस्थितीची आढावा घेतला.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धारावीमध्ये बर्‍याच मोठ्या योजना राबवण्यात आल्या. पालिका, स्वसंसेवी संस्था, राज्य सरकार आणि इतर अनेक संस्थांनी मिळून सुमारे चार लाख घरांचे सर्वेक्षण केलं. सुरुवातीच्या टप्प्यात सौम्य लक्षणं असलेल्या लोकांची वेगळी राहण्याची सोय केली.


हेही वाचा : Exclusive : गोरेगाव ते दहिसर भागात COVID 19 रुग्णांसाठी डायलिसिसची सुविधा नाही


सध्या या भागात संक्रमित रुग्णांची एकूण संख्या २ हजार ३३५ वर पोहोचली आहे. त्यापैकी ३५२ रुग्ण उपचार घेत आहेत. तर १ हजार ७३५ लोक बरे झाले आहेत. धारावीमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोना रूग्णांची संख्या लक्षणीय घटली आहे. यासह पालिकेनं धारावीतील कोरोना बेडही कमी करण्यास सुरवात केली आहे.

धारावीत ८ वेगेवगेळी विलगीकरण केंद्र आहेत. ३ हजार ८०० खाटांपैकी १००० ते २००० खाटांची संख्या कमी करत आहेत. धारावी नगरपालिका शाळेत राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ७०० बेड्स बेड आणि बीएमसी केजी / उत्तर वॉर्ड परिसरात ३०० बेड्स आहेत. धारावीतील रूग्णांच्या संख्येवर विजय मिळवल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेनंही धारावी मॉडेल मुंबई पश्चिम उपनगरीय भागात राबवणार आहे.हेही वाचा

खाजगी कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या COVID 19 टेस्टची परवानगी, 'या' आहेत अटी

कोरोना चाचणीसाठी आता डॉक्टरांच्या चिठ्ठीची नाही गरज

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा