Advertisement

मी इथंच बसलोय, सरकार पाडून दाखवा- उद्धव ठाकरे

मी इथंच बसलोय, मुलाखत सुरू असताना सरकार पाडून दाखवा, असं खुलं आव्हान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या विरोधकांना दिलं आहे.

मी इथंच बसलोय, सरकार पाडून दाखवा- उद्धव ठाकरे
SHARES

मी इथंच बसलोय, मुलाखत सुरू असताना सरकार पाडून दाखवा, असं खुलं आव्हान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या विरोधकांना दिलं आहे. सामनाला दिलेल्या मॅरेथाॅन मुलाखतीचा दुसरा प्रोमो शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटरवर टाकला आहे, यांत उद्धव ठाकरे हे वक्तव्य करताना दिसत आहेत. (sanjay raut released second promo of maharashtra cm uddhav thackeray interview in saamana)

महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी विरोधक सातत्याने प्रयत्न करत आहेत. या आरोपांना उत्तर देताना राज्यातील सरकार पाडण्याची भाजपला गरज नाही. ते अंतर्विरोधानं आपोआपच पडेल, असा टाेमणा भाजप नेत्यांकडून वरचेवर मारण्यात येतो. त्याला मुख्यमंत्र्यांनी आपल्या शैलीत उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. 

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दीर्घ मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत येत्या २५ आणि २६ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीचा दुसरा प्रोमो संजय राऊत यांनी ऊद्धव ठाकरे यांची Unlocked मुलाखत नावाने आपल्या ट्विटर हँडलवर टाकला आहे.

हेही वाचा - मी काही डोनाल्ड ट्रम्प नाही- उद्धव ठाकरे

या प्रोमोमध्ये विरोधक राज्यातील सरकारला रिक्षाप्रमाणे तीनचाकी सरकार असं म्हणतं त्यावर तुमचं मत काय, असा प्रश्न संजय राऊत मुख्यमंत्र्यांना विचारत आहेत. त्यावर केंद्रातील सरकारला किती चाकं आहे? असा प्रतिप्रश्न मुख्यमंत्री करत आहेत. केंद्रातील राजकारणाकडे सध्या तुम्ही कोणत्या दृष्टीने पाहता, या प्रश्नावर बोलताना सध्या आपल्याला चीन नकोसा झाला आहे, पण कालांतराने हिंदी-चिनी भाई भाई असं होणार नाही का? मी वयाच्या साठाव्या वर्षी जरी मुख्यमंत्री झालो असलो, तरी हा केवळ योगायोग आहे. याच'साठी' केला होता अट्टाहास, असा त्याचा अर्थ नाही. मी तर इथंच बसलोय. माझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडून दाखवा. मी आजही माझी सही 'आपला नम्र' अशीच करतो, असं सांगत महाविकास आघाडीचं सरकार केवळ मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवण्यासाठी बनवलेलं नाही, हे सांगण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला आहे.  

मुलाखतीच्या पहिल्या प्रोमोमध्ये 'मी काही डोनाल्ड ट्रम्प नाही. माझ्या माणसांना तळमळताना मी पाहू शकत नाही,' अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात गेल्या ४ महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊन संदर्भात मत व्यक्त केलं होतं. याआधी संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली मुलाखत बरीच वादळी ठरली होती.

हेही वाचा - Ram Mandir: उद्धव ठाकरेंनी अयोध्येला जाऊ नये, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं मत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा