Advertisement

मी काही डोनाल्ड ट्रम्प नाही- उद्धव ठाकरे

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'साठी उद्धव ठाकरे यांनी एक मॅरेथॉन मुलाखत दिली आहे. ही मुलाखत येत्या २५ आणि २६ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे.

मी काही डोनाल्ड ट्रम्प नाही- उद्धव ठाकरे
SHARES

'मी काही डोनाल्ड ट्रम्प नाही. माझ्या माणसांना तळमळताना मी पाहू शकत नाही,' अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात गेल्या ४ महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊन संदर्भात मत व्यक्त केलं. शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा प्रोमो राऊत यांनी नुकताच आपल्या ट्विटर अकाऊंटला शेअर केला आहे. या प्रोमोत उद्धव ठाकरे अनेक विषयांवर बेधडकपणे उत्तरं देताना दिसत आहे. (i am not a donald trump says maharashtra cm uddhav thackeray in saamana interview)

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'साठी उद्धव ठाकरे यांनी एक मॅरेथॉन मुलाखत दिली आहे. ही मुलाखत येत्या २५ आणि २६ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. याआधी संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली मुलाखत बरीच वादळी ठरली होती. त्यापाठोपाठ संजय राऊत यांनी या मुलाखतीचा प्रोमो आपल्या ट्विटर हँडलवर टाकला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिलखुलास मुलाखत असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

हेही वाचा - Ram Mandir: उद्धव ठाकरेंनी अयोध्येला जाऊ नये, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं मत

या मुलाखतीत संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लाॅकडाऊनसंदर्भात प्रश्न विचारताना दिसत आहेत. मुंबईच्या रस्त्यावर वडा पाव कधी मिळणार? लोकं आता कंटाळली आहे, असं संजय राऊत म्हणत आहेत. तर लाॅकडाऊन आपण टप्प्याटप्प्याने सोडवत आहोत. एखादी गोष्ट पटली तर टीकेला न घाबरता ती गोष्ट करणारच, मी काही ट्रम्प नाही, माझी माणसं तळमळताना मी बघू शकत नाही. असं कुणी समजू नका की लहान मुलांना कोरोना होत नाही. परीक्षा घेण्याच्या मी देखील मताचा आहे, पण… अशा अनेक मुद्द्यांवर उद्धव ठाकरे मत मांडताना दिसत आहेत. 

ही मुलाखत किती वादळी ठरते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.  

मिशन बिगीन अगेन अंतर्गत मुंबई अनलाॅक करण्याचा आशावाद राज्य सरकारकडून दाखवण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात मात्र अनेक जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन लागू करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांच्या व्यवहारांवरही मर्यादा येत आहेत. यावरून महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये मतमतांतरे आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी लाॅकडाऊनबाबत सर्वांचं मत विचारात घेतलं जावं, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं लाॅकडाऊनबाबतचं मत जाणून घ्यायला सर्वांनाच आवडणार आहे.

हेही वाचा - लाॅकडाऊनचे उल्लंघन, पोलिसांनी केल्या ९२ हजार गाड्या जप्त

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा