वाहतूककोडींवर पर्याय; मुंबई पोलिसांची ‘सॅगवे’ने गस्त

यातील दहा सेग वे हे वरळी साठी तर पाच नरिमन पॉइंट साठी आहेत. त्याचप्रमाणे बांद्रा, जुहू, वर्सोवा या ठिकाणी देखील हे सेग वे देण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली

वाहतूककोडींवर पर्याय; मुंबई पोलिसांची ‘सॅगवे’ने गस्त
SHARES

मुंबईत पर्यटकांचे आकर्षण  असलेल्या मरीनड्राइव्ह पोलिस आता सॅग-वे या इकोफ्रेंडली वाहनावरून गस्त घालणार आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रायोगिक तत्वावर दोन सॅग-वे पोलिस खात्यात दाखल करण्यात आले होते. पोलिसांना या सॅग-वे द्वारे गस्त घालणे सोईचे असल्याचे लक्षात आल्यानंतर मुंबई पोलिस दलात आधुनिक सुसज्ज यंत्रणा व सामग्री ठेवण्यावर भर देण्याच्या हेतूने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ५० सॅग-वे पोलिस दलात घेतले आहे. या सॅग-वे द्वारे मरीनड्राइव्ह, वरळी, बांद्रा, जुहू, वर्सोवा या ठिकाणी गस्त घातली जाणार आहे.

हेही वाचाः- क्रॉफर्ट मार्केट परिसरात भीषण आग, महापौरांचा उंदरावर आरोप...

मुंबईचा मरीनड्राइव्ह परिसर हा राणीचा कंटहार म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाईत  हे दृश्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येतात. त्याच बरोबर पहाटे आणि सायंकाळी मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी व्यायामासाठी किंवा वेळ घालवण्यासाठी येत असतात. मरीनड्राइव्ह ते गिरगाव चौपाटी हे दोन किलोमीटरचे अंतर असून पोलिस टप्या टप्यावर तैनात असतात. मात्र त्यांना पायी  गस्त घालावी लागते. दिवसभरात ठरावीक अंतर वारंवार चालण्याने त्यांना नाहक त्रास होतो. त्यामुळे पोलिसांनी सायकलीने गस्त सुरू केली. त्यामुळे त्या परिसरातील महिलांच्या छेडछाडीचे प्रकार पूर्णपणे थांबले. मात्र वाहतूक कोंडीत सायकलद्वारे वाट काढत पुढे जाण्यास मोठा विलंब लागत होता.  मुंबईत अत्याधुनिक सॅग-वे आणल्यास पोलिसांना हे अंतर अवघ्या काही मिनिटात कापणे सोपे होऊ शकते. त्या पार्श्वभूमिवर तत्कालिन पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी सॅग-वे ची संकल्पना प्रायोगित तत्वावर सुरू केली. ही संकल्पना प्रायोगिक तत्वावर यशस्वी ठरल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिस दलात ५० सॅग-वेचा समाविष्ठ करून घेतले. यातील दहा  सेग वे हे वरळी साठी तर पाच नरिमन पॉइंट साठी आहेत. त्याचप्रमाणे बांद्रा, जुहू, वर्सोवा या ठिकाणी देखील हे सेग वे देण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली

 हेही वाचाः- कोस्टल रोडला स्थगिती नाहीच- उच्च न्यायालय

या सॅग-वे चे उद्घाटन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरूवारी मरीनड्राइव्ह येथे केले. त्यावेळी          यावेळी आ. रोहित पवार मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सह पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त दक्षिण विभाग निशिथ मिश्रा तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.महाराष्ट्राचे पोलीस दल हे जागतिक पोलिसिंग स्टॅंडर्ड नुसार अत्याधुनिक सुसज्ज अशा साधन सामग्री भक्कम करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरविले आहे. त्यानुसार या सेग वे चे उद्घाटन करण्यात आले असल्याची माहिती श्री. देशमुख यांनी यावेळी दिली. सध्याच्या कोरोनाच्या म्हणजे लॉकडाऊनच्या काळात अशा प्रकारची यंत्रणा पोलिसांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पोलिसाच्या मास्कला माईक लावण्यात येणार असून ते त्या द्वारे लोकांना गर्दीच्या ठिकाणी सुरक्षितते संदर्भात सूचना देऊ शकतील, तसेच त्यांच्या मदतीला पब्लिक ऍड्रेस सिस्टीम असलेले अत्याधुनिक ड्रोन देखील आहेत. त्याचाही उपयोग होऊ शकेल, असे श्री. देशमुख म्हणाले.

संबंधित विषय