Advertisement

क्रॉफर्ट मार्केट परिसरात भीषण आग, महापौरांचा उंदरावर आरोप...

मुंबईच्या क्रॉफर्ट मार्केट परिसरात भीषण आग लागली आहे. क्रॉफर्ट मार्केट परिसरात अनेक दुकानं आहेत. याशिवाय भाजीपाला, फळे, खाद्यपदार्थांचा मोठा बाजार या परिसरात भरतो. क्रॉफर्ट मार्केट छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर आहे.

क्रॉफर्ट मार्केट परिसरात भीषण आग, महापौरांचा उंदरावर आरोप...
SHARES

मुंबईच्या क्रॉफर्ट मार्केट परिसरात भीषण आग लागली आहे. क्रॉफर्ट मार्केट परिसरात अनेक दुकानं आहेत. याशिवाय भाजीपाला, फळे, खाद्यपदार्थांचा मोठा बाजार या परिसरात भरतो. क्रॉफर्ट मार्केट छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर आहे.

क्रॉफर्ट मार्केटमधल्या ४ दुकानांमध्ये ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी ६ फायर इंजिन, ३ जम्बो टँकर्स पाठवण्यात आले आहेत. सध्या तरी सगळी दुकानं बंद आहेत. त्यामुळे उंदराने वायर कुरतडल्यानंतर शाॅर्ट सर्किट होऊन आग लागली असावी, असा अंदाज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अंदाज व्यक्त केला आहे.

गुरुवारी संध्याकाळी ४ वाजून १६ मिनिटांनी मुंबई अग्निशमन विभागाला या आगीबद्दल कळवण्यात आलं. त्यानंतर  आग विझवण्यासाठी ९ अग्निशमन गाड्या सध्या दाखल जाल्या आहेत. यात मुंबई अग्निशमन केंद्राचे ६ फायर वाहन, ५ वॉटर टँकर व १ रेसक्यू वाहन घटनास्थळी उपस्थित असून अग्निशमन दलाच्या जवानांनकडून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. क्रॉफर्ड मार्केटमधील तळ मजल्याच्या दुकानातून ही आग सुरू झाली. सदर घटनास्थळी अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळतेय.

दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नसून पोलीसदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. या मार्केटमध्ये अनेक छोटी दुकानं असून यामध्ये मोठ्या प्रमाणात माल भरलेला असतो. त्यामुळे एकूण काय नुकसान झालं याबद्दल अद्याप काहीही माहिती हाती आलेली नाही.

हेही वाचा

वांद्रेच्या उच्चभ्रूवस्तीत चोरट्यांची दहशत

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा