वांद्रेच्या उच्चभ्रू वस्तीत चोरट्यांची दहशत

समीर बिल्डिंगच्या सुरक्षा रक्षकाला मंगळवारी रात्री २ च्या सुमारास तीन अनोळखी व्यक्तींनी पत्ता विचारण्यासाठी जवळ बोलावले. सुरक्षा रक्षक गेटमधून बाहेर आल्यानंतर या तिघांनी त्याला बेदम मारहाण केली.

वांद्रेच्या उच्चभ्रू वस्तीत चोरट्यांची दहशत
SHARES

वांद्रेच्या उच्चभ्रूवस्तीत सध्या भूरट्या चोरांनी धुमाकुळ घातला आहे. रात्रीच्या अंधारात हे चोरटे उच्चभ्रू वस्तीतील इमारतीच्या सुरक्षा रक्षकांना टार्गेट करत असून या सुरक्षा रक्षकाला मारहाण करून त्याला लुबाडत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नुकताच एक गुन्हा वांद्रे पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचाः- नवीमुंबईत पोलिसांसाठी विशेष कोविड रुग्णालय

वांद्रेच्या पॅरीरोडवरील समीर बिल्डिंगच्या सुरक्षा रक्षकाला मंगळवारी रात्री २ च्या सुमारास तीन अनोळखी व्यक्तींनी पत्ता विचारण्यासाठी जवळ बोलावले. सुरक्षा रक्षक गेटमधून बाहेर आल्यानंतर या तिघांनी त्याला बेदम मारहाण केली. त्याच्याजवळी मोबाइल आणि काही रक्कम घेऊन या तिघांनी तेथून पळ काढला. या घटनेची माहिती सुरक्षा रक्षकाने त्या बिल्डिंगच्या सेक्रेटरी डर्ली वाझ यांना दिल्यानंतर त्यांनी वांद्रे पोलिस ठाण्यात तीन अनोळखी आरोपींविरोधात तक्रार नोंदवली. त्याच बरोबर त्यांनी परिसरातील रहिवाशी संघटनांना ही या घटनेची माहिती देऊन सतर्क केले. मात्र याच प्रकारची घटना काही दिवसांपूर्वी शेजारील इमारतीत घडल्याचे ही वाझ यांनी पोलिसांना सांगितले. या पूर्वी ही अशा भूरट्या चोरांकडून पंपहाऊसमध्ये चोरी, सुरक्षा रक्षकांना लुबाडण्याच्या घटना त्या परिसरातील असोसिएशनकडे आल्याचे वाझ यांनी पोलिसांना सांगितले.

हेही वाचाः- अफवा पसरवणाऱ्यांविरोधात सायबर पोलिसांनी फास आवळला

३ जून रोजी  या चोरट्यांनी पंपहाऊसमध्ये घुसून सुरक्षा रक्षकाला लुबाडले होते. त्या वेळी नुकताच सुरक्षा रक्षकाचा पगार झाला होता. त्या चोराने सुरक्षा रक्षकाचा संपूर्ण पगार आणि मोबाइल हिसकावून तेथून पळ काढला.  सीसीटिव्हीत हा सर्व प्रकार कैद झालेला आहे. या चोऱ्या रोखण्यासाठी रहिवाशी संघटनेकडून सुरक्षा रक्षकांना शिट्या दिलेल्या असून रात्रीच्या वेळीस वाजवण्यास सांगितले आहे. काहीदिवसांपूर्वी डिमोंट पार्क या इमारतीत तीन घरांमध्ये दरोडे पडल्याची नोंद आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात नुकताच तीन आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून वांद्रे पोलिसांना त्या ठिकाणी गस्त वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे असल्याचे परिमंडळ ९ चे पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा